21 February 2025 12:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News

BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 | बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजीनियरिंग केलेल्या तरुणांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध केल्या गेल्या आहेत. काही रिक्त पदांसाठी सिलेक्शन झाल्यानंतर नोकरदाराला दरमहा मिळतील 1,42,000 रुपये.

एकूण 690 जागांसाठी मेगा भरती :
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आजची तरुण पिढी दिवस-रात्र एक करून अभ्यास करते. चांगली नोकरी मिळून उच्चपद गाठण्यासाजठी तरुण पिढी बऱ्याचदा सरकारी नोकरीच्या शोधात असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या इंजिनीयरिंग विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महानगरपालिकेत भरती सुरू झाली असून एकूण 690 रिक्त जागांसाठी मेगा भरती काढली आहे.

बीएमसी नोकरी बाबतची संपूर्ण माहिती बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसारख्या चांगल्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी सोडू नका. दरम्यान नोकरी बाबतची ही जाहिरात नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाद्वारे सांगण्यात आली आहे.

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वेतन :
बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघालेल्या मेगा भरतीमध्ये इंजीनियरिंग विद्यार्थ्यांकरिता सेकंडरी इंजिनियर, जूनियर इंजिनियर, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल त्याचबरोबर यांत्रिकी आणि विद्युत इंजिनियर या पदांसाठी वेगवेगळ्या पगारांची भरती काढण्यात आली आहे.

अटी आणि नियम :
महानगरपालिकेचे निघालेल्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 33 या वयोगटातील असणे अनिवार्य आहे. सेकंडरी इंजिनियर पदांसाठी 44,900 ते 1424200 रुपयांचं वेतन देण्यात येणार आहे तर, जूनियर इंजिनीयर पदांसाठी 418000 ते 1323300 रुपये वेतन मिळणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकता. भरघोस पगारासह उच्च पदांसाठी भरती निघाली आहे.

महत्त्वाचं :
1) इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनीयर पदांसाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल,ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शन इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे गरजेचे आहे.
2) सिव्हिल इंजिनियरिंग पदांसाठी उमेदवाराकडे कन्स्ट्रक्शन किंवा सिविल टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला पुणे गरजेचे आहे.
3) नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींसाठी अर्ज प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असून 2 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुभा दिली आहे.

Latest Marathi News | BMC Recruitment 2024 18 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BMC Recruitment 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x