12 January 2025 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल EPFO Minimum Pension | खाजगी पेन्शनधारकांना दरमहा किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार, महत्वाची अपडेट आली Bank Account Alert | बँक बचत खात्यात 'या' पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू नका, केला तर इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Business Idea | महिला आणि तरुण सुद्धा घरातून सुरु करू शकतात 'हा' डिमांडिंग व्यवसाय, महिना लाखोत कमाई होईल Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
x

उमेदवारांच्या मेहनतीला पनवती? | एमपीएससीने दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती, इव्हेन्ट बारगळला?

MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा ही राज्यातील सर्वात कठीण परिक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी या परिक्षेला बसतात. मात्र, मोजकेच विद्यार्थ्यांना त्यात यश मिळते. या एमपीएससी परिक्षेसंदर्भातच मोठी बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उमेदवारी दिलेल्या 111 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या उमेदवारांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिलं जाणार होतं. मात्र, नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देता येणार नाही – मुंबई हायकोर्ट
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयात या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या विरोधात तातडीची याचिका दाखल करण्यात आली होती. संबंधित याचिका दाखल करणाऱ्या तीन EWS उमेदवारांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

तातडीच्या सुनावणी दरम्यान निकाल
ज्या 111 उममेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास स्थगिती देण्यात आलीय त्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यात येणार होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज संध्याकाळी झालेल्या तातडीच्या सुनावणी दरम्यान याबाबत निकाल देण्यात आला.

नियुक्ती पत्र देण्याचा इव्हेन्ट फसला?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आलेल्यांपैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाने स्थगिती दिलीय. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यावर हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देता येणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bombay high court gave stays on issue of appointment letters to candidates nominated by MPSC check details on 01 December 2022.

हॅशटॅग्स

#MPSC Recruitment 2022(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x