5 February 2025 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

UPSC Examination 2022 Calendar | यूपीएससीकडून 2022 च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

Download UPSC Examination 2022 Calendar

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट | केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी upsc.gov.in ला भेट देऊन वेळापत्रक पाहावं. 2022 मधील यूपीएससीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होतील.

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2022 च्या सर्व परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतील. 2021 मध्येही काही परिक्षांचं नोटिफिकेशन जारी केलं जाणार आहे. अभियांत्रिकी सेवा 2022, संयुक्त जीईओ सायंटिस्ट सारख्या परीक्षांचा त्यामध्ये समावेश असेल. या परीक्षांची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल. CISC परीक्षा 2022 चे वेळापत्रक 1 डिसेंबर रोजी जारी केले जाईल.

2022 मधील केंद्रीय लोकसेवा आयोगाचं परीक्षांचं वेळापत्रक कसं पाहायचं?
* परीक्षांचं वेळापत्रक पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in वर भेट द्या.
* वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर Whats New वर क्लिक करा.
* यापुढे परीक्षा लिंकवर क्लिक करा
* यापुढे कॅलेंडरवर क्लिक करा.
* यानंतर वार्षिक कॅलेंडर 2022 च्या लिंकवर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर कॅलेंडरचे PDF ओपन होईल.

परीक्षेच्या तारखा:
* अभियांत्रिकी सेवा (प्रारंभिक) परीक्षा 2022 / एकत्रित भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा 2022: 20 फेब्रुवारी 2022
* CISF AC (EXE) LDCE-2022: 13 मार्च 2022
* NDA आणि NA परीक्षा (I), 2022/ CDS परीक्षा (I), 2022: 4 एप्रिल 2022
* नागरी सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2022 / भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा, 2022, CS (P) परीक्षा 2022: 5 जून 2022
* IES/ISS परीक्षा, 2022: 24 जून 2022
* एकत्रित भू-वैज्ञानिक (पुरुष) परीक्षा, 2022: 25 जून 2022
* अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा, 2022: 26 जून 2022
* एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, 2022: 17 जुलै 2022
* केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा 2022: 7 ऑगस्ट 2022
* NDA आणि NA परीक्षा (II), 2022 / CDS परीक्षा (II), 2022: 4 सप्टेंबर 2022
* नागरी सेवा (मुख्य) परीक्षा 2022: 16 सप्टेंबर 2022
* भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2022: 20 नोव्हेंबर 2022
* SO/स्टेनो (GD-B/GD-I) LDCE: 10 डिसेंबर 2022
* UPSC RT/परीक्षा: 18 डिसेंबर 2022

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Download UPSC Examination 2022 Calendar online news updates.

हॅशटॅग्स

#UPSC(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x