18 November 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

DRDO Recruitment 2022 | डीआरडीओमध्ये 1,901 जागांसाठी भरती, ओनलाईन अर्ज करू शकता

DRDO Recruitment 2022

DRDO Recruitment 2022 | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (सीईटीएम) या संस्थेने सीनिअर टेक्निकल असिस्टंट-बी आणि टेक्निशियन-ए या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर डीआरडीओ १,९०१ जणांची नियुक्ती करणार आहे.

या भरती प्रक्रियेत सहभागी झालेले इच्छुक उमेदवार डीआरडीओच्या https://drdo.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. ३ सप्टेंबरपासून वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व तंत्रज्ञ या पदावर नियुक्तीला सुरुवात होणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२२ आहे. उमेदवार शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

असा करू शकता अर्ज :
१. डीआरडीओच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी आणि तंत्रज्ञ-ए च्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
२. वेबसाइटवर गेल्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या डीआरडीओ सीसेप्टम लिंकवर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेब पेज उघडेल.
३ आता नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता व इतर तपशील असे मागितलेले तपशील भरावे लागणार आहेत.
४. सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला अर्ज शुल्क जमा करावे लागेल. यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सेवा वापरू शकता.
५ अर्ज शुल्क सबमिट केल्यानंतर, आपण सबमिट बटणावर क्लिक करा
६. अर्ज यशस्वीपणे स्वीकारल्यानंतर तुम्ही तुमचा अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी, जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास त्याचा वापर करता येईल.

परीक्षा कधी होणार आणि अॅडमिट कार्ड कसं मिळणार :
या भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची म्हणजेच परीक्षेची तारीख डीआरडीओकडून जाहीर करण्यात आलेली नाही, डीआरडीओ लवकरच याची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 2 आठवडे आधी वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार असल्याची माहिती डीआरडीओने दिली आहे. उमेदवारांना त्यांच्या तपशीलाच्या मदतीने प्रवेशपत्र सहज डाउनलोड करता येणार आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की जे उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी किंवा कोडसाठी अर्ज करीत आहेत त्यांना स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक असेल.

वयाची अट :
18 वर्ष ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. तर ओबीसी, एससी आणि एसटी उमेदवारांनाही कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता :
सीनिअर टेक्निकल असिस्टंट-बी (एसटीए-बी) पदासाठी जे उमेदवार एआयसीटीई मान्यताप्राप्त कॉलेजमधून विज्ञान किंवा डिप्लोमा इन इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स आणि संबंधित विषयातील बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा आहे, अशा उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. टेक्निशियन-ए पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणं तसंच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी डीआरडीओने जारी केलेली अधिसूचना पाहा.

पगार :
सीनिअर टेक्निकल असिस्टंट-बी पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये, तर टेक्निशियन-ए पदावर नोकरी करणाऱ्या उमेदवारांना १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :
अर्जदारांना दोन टप्प्यातील स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवाराला टियर-1 सीबीटी स्क्रीनिंग टेस्ट, टियर-2 सीबीटी निवड चाचणी पास करावे लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DRDO Recruitment 2022 for 1901 check details 04 September 2022.

हॅशटॅग्स

#DRDO Recruitment 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x