12 January 2025 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम EPFO ELI Scheme | खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, EPFO इन्सेन्टिव्ह देणार, आजच फायदा घ्या
x

Indian Post Recruitment 2021 | भारतीय डाक विभागात (महाराष्ट्र) 257 जागांसाठी भरती

Indian Post Recruitment 2021

मुंबई, 13 नोव्हेंबर | भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये स्पोर्टस कोट्यातील 257 जागांवर भरती होणार आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु (Indian Post Recruitment 2021) शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.dopsportsrecruitment.in/ वेबसाईटला भेट द्यावी.

Indian Post Recruitment 2021. Indian Post Department has announced recruitment process for Maharashtra Circle. The recruitment will be done for 257 posts in Sports Circle in Maharashtra Circle :

एकूण 257 जागांसाठी भरती:
पोस्टल असिस्टंट (93), सॉर्टिंग असिस्टंट (09), पोस्टमन (113), मल्टी टास्किंग स्टाफ (42) अशा 257 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

अर्ज कसा कराल?
जाहिरातीनुसार https://www.dopsportsrecruitment.in/ या वेबसाईटवर 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.

शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी आणि बारावी पास असणे आवश्यक आहे. यासह उमेदवारांना सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सा यकल चालवित असल्याचे मानले जाईल. पोस्टानं जाहीर केल्यानुसार स्पोर्टस कोट्यासाठी निश्चित करण्यात आलेली पात्रता उमेदवारांची असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि शुल्क:
या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 27 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी 200 रुपये आकारण्यात येईल.

अर्ज कसा करायचा?
टपाल विभागाच्या भर्ती पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत माहितीनुसार अर्ज, नोंदणी फी, अर्ज भरणे आणि अर्ज सादर करणे या तीन टप्प्यात अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
* भरती पोर्टलला भेट दिल्यानंतर, उमेदवारांनी प्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पृष्ठावर जाणे आवश्यक आहे.
* त्यानंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सक्षम होईल.
* यानंतर, उमेदवारांनी नोंदणीकृत नोंदणी क्रमांकाद्वारे विहित अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल.
* फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंक वर क्लिक करुन अर्ज सबमिशन पृष्ठावर जाऊ शकतात.
* आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

सूचना:
अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Indian Post Recruitment 2021 for 257 posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x