6 November 2024 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Sarkari Naukri | महाराष्ट्र आरोग्य विभागात 8,500 पदांची भरती | जाहिरात प्रसिद्ध

Maharashtra health department recruitment 2021, free job alert, majhi naukri, Freshersworld

मुंबई, २३ जानेवारी:  कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती अखेर जाहीर झाली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच सांगितलं होते.

जाहिरातीनुसार रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे. आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. याआधी फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरणार आहेत.

राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध करुन अनेक विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याचं म्हटलं जात आहे. जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 28 फेब्रुवारी 2021रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, 17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होईल. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होईल. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले होते.

 

News English Summary: According to the advertisement, out of the total 17,000 vacancies, 50 per cent will be for vacancies. More information is available on the health department’s website. This advertisement has brought relief to many who have been waiting for a long time. Earlier, in February 2019, applications were invited from Mahaportal for this advertisement. Candidates who were eligible at that time will now also be eligible for new recruitment in the process.

News English Title: Maharashtra health department recruitment 2021 for 8500 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x