22 November 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Maharashtra Police Bharti | तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज केलाय? फक्त 90 मिनिटांत ठरणार तुमचं भविष्य, परीक्षेचं पॅटर्न पहा

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022| महाराष्ट्र पोलीस विभागाने कॉन्स्टेबल पदांसाठी 18000 हून अधिक बंपर भरती जारी केली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी अधिकृत वेबसाइट policerecruitment2022.mahait.org किंवा mahapolice.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी 9 नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विभागाने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल, SRPF पोलिस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पोलिस कॉन्स्टेबल पदांसाठी सुमारे 18334 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक वाचा.

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल रिक्त जागा
* पोलीस कॉन्स्टेबल: 14956 पदे
* SRPF पोलीस कॉन्स्टेबल: 1204 पदे
* ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल: 2174 पदे
* एकूण रिक्त पदांची संख्या – 18,334 पदे

आज आपण या पदभरतीचं संपूर्ण परीक्षेचं पॅटर्न सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. महाराष्ट्र पोलीस भरती 2022प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या पॅटर्नबद्दल जाणून घेऊया.

शारीरिक चाचणी – पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी – एकूण 50 गुण
पुरुष उमेदवारासाठी
* 1600 मीटर धावणे (20 गुण),
* 100 मीटर धावणे (15 गुण),
* गोळाफेक (15 गुण)

महिला उमेदवार
* 800 मीटर धावणे (20 गुण)
* 100 मीटर धावणे (15 गुण)
* गोळाफेक (15 गुण)

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल – सशस्त्र पोलीस शिपाई
(पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुण
* 5 कि.मी. धावणे (50 गुण),
* 100 मीटर धावणे (25गुण),
* गोळाफेक (25 गुण)

महत्वाची टीप :
शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

अशी असेल लेखी परीक्षा :
* 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा – वेळ 90 मिनिट
* PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल
* पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
* लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील.
* चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.
* परीक्षा मराठीतूनच होणार आहे.
* परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
* पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

Maharashtra Police Bharti

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Police Bharti 2022 examination pattern check details on 13 November 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Police Bharti 2022(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x