5 November 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

Sarkari Naukri | महाराष्ट्र पोलीसमध्ये 5300 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू | GR वाचा

Maharashtra Police Recruitment 2021, free job alert, majhi naukri, freshersworld

मुंबई, २३ जानेवारी: राज्यात पोलिस भरतीसाठी पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. आज नागपुरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अनिल देशमुख यांच्या या घोषणेमुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याचबरोबर, पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होईल, असे अनिल देशमुख म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी 2538 जागांची भरती झाल्यानंतर पुन्हा गरज पडल्यास आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते.

भरती बाबतचा GR येथे वाचा: Click Here

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया एसईबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडली होती. गृह मंत्रालयाने भरती प्रक्रियेत SEBC आरक्षण न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मराठा समाजातील सर्वच संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh has informed that the recruitment process for 5300 posts in the first phase has started in the state. He made the remarks while interacting with the media in Nagpur today. Therefore, even though the Maratha reservation has been postponed, the police recruitment process will start in the state. Anil Deshmukh’s announcement has come as a great relief to the students preparing for police recruitment.

News English Title: Maharashtra Police Recruitment 2021 for 5300 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x