15 January 2025 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

पोलीस भरतीची तयारी करत आहात? मग सुरु करा ऑनलाईन परीक्षेची तयारी महाराष्ट्रनामावर

Mahagov, Sarkari Nokri, Sarkari Nokari Pariksha, Mahapariksha Portal, Mahanmk, Police Bharti Pariksha, Talathi Bharti, MPSC online test, UPSC Online Test

मुंबई: राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या विविध भरती परीक्षा तसेच विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांची सर्व प्रक्रिया एकाच पोर्टलच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने स्वतंत्र “महापरीक्षा” हे पोर्टल (Mahapariksha Portal) तयार केले आहे. या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल असा सरकारने आदेश काढला होता. त्यानुसार सरकारी परीक्षांसाठी या पोर्टलचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC – Maharashtra Public Service Commission), महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांसह अन्य यंत्रणांमार्फत भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येतात. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षासह (सीईटी सेल) इतर अभ्यासकांच्या प्रवेश प्रक्रिया संबंधित विभागाकडून राबविल्या जातात. बहुतेक भरती परीक्षा ऑफलाईन म्हणजे लेखी स्वरूपात घेतल्या जातात. उमेदवारांना ‘ओएनआर’ शीटवर उत्तरे भरावी लागतात. या प्रक्रियेत बऱ्याचदा गोंधळ निर्माण होतो. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हावी, या उद्देशाने आयटी विभागाने “महा परीक्षा” हे स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.

सार्वजनिक कंपनी, सोसायट्या, सरकारी महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीदेखील याच पोर्टलचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. संगणक आधारित परीक्षेसाठी प्रति विद्यार्थी २५० रुपये तर ओएमआर आधारित परीक्षेसाठी २२५ रुपये शुल्क आकारले जाते असे शासनाच्या निर्णयात म्हटले आहे.

मात्र असं असलं तरी या पोर्टलवर विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, उमेदवारांनी तसेच सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींनी राज्यभर आंदोलनं करत सदर पोर्टल बंद करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला होता, मात्र त्याने काहीच फायदा होताना दिसला नाही. वास्तविक ग्रामीण भागातील तरुणांना हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी देखील प्रचंड अडचणी येतात असं देखील आमच्या निदर्शनास आलं आहे आणि राज्यातील लाखो तरुण-तरुणींना ऑनलाईन अभ्यास करता यावा यासाठी आम्ही महाराष्ट्रनामा न्युज पोर्टलवर (Maharashtranama News Portal) सरकारी नोकरीचा अभ्यास करण्याची सोया करून देतो आहोत. लवकरच महाराष्ट्रातील पोलीस भरती (Maharashtra Police Bharti) तसेच इतर परीक्षा पार पडणार आहेत. तरी तरुणांनी नक्कीच या सेवेचा लाभ घ्यावा आणि इतरांना देखील याबद्दल माहिती द्यावी ही विनंती.

सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास हा आमच्या सामाजिक उपक्रमाचा भाग असून, समाजाप्रती आमची जवाबदारी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. तरी सर्व तरुणांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आणि इतरांना देखील त्याबद्दल माहिती द्यावी ही विनंती.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x