22 November 2024 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

MPSC Exams | विद्यार्थ्यांची संख्या २६ लाखांपर्यंत वाढली | आयोगाकडे कर्मचार्‍यांचा तुटवडा

MPSC Exams, MPSC Exam 2020, UPSC Exams, Staff Selection Exams

पुणे, १ ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ५ लाखांहून २६ लाखांपर्यंत वाढली आहे. मात्र , राज्य शासनाकडून आयोगाच्या कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी घट केले जात आहे. त्यामुळे आयोगाला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी एमपीएससी (MPSC Exam students) करून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांना प्रविष्ट होतात. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. २०१०-११ यावर्षी आयोगाकडे परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख 65 हजार 839 एवढी होती तर ही संख्या २०१८-१९ मध्ये २६ लाख ६४ हजार ४१ एवढी झाली. आयोगाकडे दिवसेंदिवस परीक्षांचा ताण वाढत आहे.अशा परिस्थितीत राज्य शासनाने आयोगाची सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाची ८ व लिपिक टंकलेखक कर्मचारी वर्गाची १६ पदे कमी करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने शासनाला मनुष्यबळ बाबत निर्माण झालेल्या अडचणी तसेच वस्तुस्थिती सांगितली. मात्र त्यानंतर आहे.शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही.

महापरीक्षा पोर्टल सह राजपत्रित गट ब व गट क दर्जाच्या पदांची भरती आयोगामार्फत करता येऊ शकते, याबाबतचा पत्रव्यवहार आयोगातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आला होता. मात्र, तरीही शासन याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही. त्यामुळे शासनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग गुंडाळून ठेवायचा आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या दहा वर्षात आयोगाच्या परीक्षा विविध देणाऱ्या विद्यार्थी संख्येत (MPSC Exam students) वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचारी संख्या वाढली नाही. आयोगाला पुरेसे मनुष्यबळ दिले तरच ते परिणामकारकपणे काम करू शकते. त्यामुळे आढावा घेऊन आयोगाला पुरेसे मनुष्यबळ द्यायला हवे. – व्ही.एन. मोरे,माजी अध्यक्ष- एमपीएससी

News English Summary: The number of students appearing for various competitive examinations conducted through the Maharashtra Public Service Commission has increased from 5 lakh to 26 lakh in the last ten years. However, instead of increasing the number of staff of the commission, the state government is reducing it. Therefore, the Commission is facing a shortage of manpower.

News English Title: MPSC Exam students count reached to 26 lakhs but board has lack of employees Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x