22 November 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

MPSC Updates | EWS पर्याय निवडण्यासाठी 22 जानेवरीपर्यंत मुदतवाढ

MPSC, SEBC students, EWS general quota

मुंबई, २५ जानेवारी: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणर्‍या पदभरती परीक्षांमध्ये ‘SEBC’ प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना 15 जानेवारीपर्यंत ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’कडून दिली होती त्याला आता मुदत वाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 22 जानेवारी पर्यंत हे बदल करू शकतात. त्यानंतर वेब लिंक बंद होणार आहे. (MPSC extends deadline for SEBC students to select EWS general quota till January 22 here is how to change category)

सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० या परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांना हे बदल सध्या करण्याची मुभा देण्यात आली आहे.

  • सर्वात प्रथम ऑनलाईन लॉगिंग करा. त्यानंतर माझं खातं पर्याय निवडा.
  • माझे अ‍ॅप्लिकेशन मध्ये स्पर्धात्मक परीक्षा हा पर्याय निवडा.
  • जाहिरातीचं वर्ष निवडल्यानंतर तुमच्या परीक्षेची निवड करा.
  • त्या परीक्षेतील ‘सिलेक्ट कॅटेगरी‘ वर क्लिक करा.
  • अराखीव (खुला) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याची निवड करा.

दरम्यान हा बदल ‘SEBC’ प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणार आहे. सध्या त्यांच्या आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आगामी परीक्षेच्या वेळेस त्यांच्या विचार खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एका वर्गातून केला जाऊ शकतो. आता 25 जानेवारी पासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी कोर्टात सुरू होणार आहे. सध्याच्या निर्णयांनुसार, वर्षभरासाठी मराठा आरक्षण नोकरी आणि शिक्षणामधून स्थगित करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.

 

News English Summary: After the interim moratorium on Maratha reservation in Maharashtra, open or EWS option has been made available to the candidates in ‘SEBC’ category in the recruitment examinations to be conducted by the Maharashtra Public Service Commission. According to the MPSC, the candidates have to change their options through the online system of MPSC till January 15, which has now been extended. Students can now make these changes until January 22nd. The web link will then close.

News English Title: MPSC extends deadline for SEBC students to select EWS general quota till January 22 here is how to change category news updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x