23 February 2025 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

MPSC PSI Recruitment | महाराष्ट्रात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

MPSC PSI Recruitment

मुंबई, १४ ऑक्टोबर | एमपीएससी बोर्डाकडून लवकरच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होण्याचं वृत्त आहे काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महाराष्ट्रातील कोरोनामुळे खोळंबलेल्या नोकरभरतीला प्रशासकीय अडथळ्यातून वेग देण्याची भूमिका घेतली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला (MPSC PSI Recruitment) मिळालं होतं.

MPSC PSI Recruitment. The Home Department conveyed the information to the MPSC Commission and accordingly the Commission has received the demand letter of Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group B Sub-Inspector of Police. Accordingly, 376 posts of Sub-Inspector of Police will be filled :

त्यानंतर मंत्रालयातील सर्व विभागातून किती जागा भरायच्या आहेत याची सविस्तर माहिती मागविली होती. त्यानुसार विविध विभागाची मागणीपत्र एमपीएससीला आता प्राप्त झाली आहेत आणि त्यानुसार एमपीएससी बोर्डाकडून प्रकिया सुरु झाली आहे. त्यानुसार गृहखात्याने सर्वात जलद माहिती एमपीएससी आयोगाकडे पोहोचवली आणि त्यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचं मागणीपत्र आयोगाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी भरती केली जाईल.

MPSC’मार्फत भरण्यात येणाऱ्या निरनिराळ्या संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाचे अंदाजे ३ टक्के कर्मचारी प्रतिवर्षी निवृत्त होतात. ४-५ वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारकडून घेण्यात आला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MPSC PSI Recruitment will be declared soon as per report.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MPSC(39)#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x