12 January 2025 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

MSRTC Recruitment 2024 | एसटी महामंडळात 208 रिक्त पदांची मोठी भरती; 10 वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

MSRTC Recruitment 2024

MSRTC Recruitment 2024 | सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठे अपडेट समोर आली आहे. एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी नवीन तरुणांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहनाकडून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहनात एकूण 208 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करायची आहे. सध्या बराचअसा तरुणवर्ग बेरोजगार आहे. 10 वी उत्तीर्ण तरुणांना हवी तशी नोकरी मिळत नाहीये. परंतु कमी शिक्षणातून सुद्धा तुम्हाला एसटी महामंडळात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

भरती प्रक्रियेविषयी जाणून घ्या :

एसटी महामंडळात 208 जागांसाठी निघालेली भरती ही यवतमाळ येथे काढण्यात आली आहे. यामध्ये मोटर मेकॅनिक या पदासाठी एकूण 75 जागा, शीटमेटल पदासाठी 30 राखीव जागा, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिकसाठी 30 जागा आणि डिझेल मेकॅनिकसाठी 34 जागा आहेत. त्याचबरोबर वेल्डरसाठी देखील 20 बघा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

वयोमर्यादा आणि शिक्षण पात्रता :

वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराचे वय 18 ते 33 या वयोगटामध्ये बसणारे असावे. अर्ज करणाऱ्या तरुणाच्या शिक्षणाविषयी सांगायचे झाले तर, त्याने कोणत्याही शाळेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर आयटीआय संबंधित कोणताही एखादा कोर्स पूर्ण केलेला असावा.

अर्ज प्रक्रियेविषयी सांगायचे झाले तर, उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाचे तुमच्याकडून 590 रुपये फॉर्म फी घेण्यात येईल. दरम्यान अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी एसटी महामंडळाचे अर्ज पूर्ण करावे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | MSRTC Recruitment 2024 Tuesday 10 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#MSRTC Recruitment 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x