5 November 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

BREAKING | केंद्र सरकारच्या नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही | मुलाखत प्रक्रिया रद्द

No interview, Central govt jobs, Sarkari Naukri, free job alert

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर : देशातील २३ राज्यांसह आठ केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारमधील गट ब (विना-राजपत्रित) आणि गट सी दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रियामध्ये १०१६ पासून मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात जितेंद्र सिंह यांनी असे नमूद केले आहे.

२०१५ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्मिक व प्रशिक्षण विभागाने यासंदर्भात दखल घेतली आणि केंद्र सरकारच्या भरतीमध्ये मुलाखती हटविण्याची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण केली. या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी, १०१६ पासून झाली आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, सरकारी नोकरीसाठी मुलाखती न घेण्यासंदर्भातील हा नियम गुजरात आणि महाराष्ट्राने अतिशय वेगाने स्वीकारला, तर इतर राज्यांनी लवकरच याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. मात्र, केंद्र सरकारच्या पाठपुराव्यानंतर आता २३ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलाखती घेणे बंद केले आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: Interview for Group-B (non-gazetted) and Group-C posts in Central government jobs has been abolished in 23 states and eight Union Territories (UTs) so far – an exercise that started with effect from January 1, 2016. All the eight UTs of India, including newly created Jammu and Kashmir and Ladakh, are among the regions along with 23 out of the 28 states of the country have so far followed Prime Minister Narendra Modi’s call which he made from the rampart of the Red Fort on the occasion of Independence Day on August 15, 2015.

News English Title: No interview required for central govt jobs in 23 states and 8 Union Territories free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x