22 November 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Sarkari Naukri | रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी | ३५,२०८ पदांवर जागा रिकाम्या

RRB NTPC Recruitment 2020, Exam Date, UPSC Exam, Banking Officer Exam, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २१ सप्टेंबर : RRB NTPC Recruitment 2020 कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात जगभरात चहूकडे आर्थिक मंदी आहे आणि लाखो लोक आपल्या नोकऱ्या गमावून बसले आहेत. अशा परिस्थितीत आता सर्वांनाच सुरक्षित आणि सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. आपणही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. RRB NTPCच्या ३५,२०८ पदांवर जागा रिकाम्या आहेत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण याचे तपशील मिळवू शकता.

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळवा अधिक माहिती:
इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून या जागा पदवीधर आणि अंडरग्रॅज्यूएट उमेदवारांसाठी देण्यात आल्या आहे. यातील १०,६०३ पदांवर अंडर ग्रॅज्यूएट उमेदवार अर्ज करू शकतात. रेल्वेकडून ट्रॅफिक सिग्नलशी संबंधित पदांसाठी निघालेल्या या जागांसाठी उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येईल.अधिक माहितीसाठी rrbonlinereg.co.in वर क्लिक करा.

काय आहेत उमेदवारांसाठी वयोमर्यादेच्या अटी?
रेल्वेकडून ट्रॅफिक सिग्नलशी संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असायला हवे तर कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे ठरवण्यात आली आहे. या वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

पदवीधर उमेदवारांना ट्रॅफिक असिस्टंटच्या पदासाठी निवडले जाईल आणि यात त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या आधारे चौथ्या दर्जानुसार ३५,४०० रुपये आणि ग्रेड पे पगाराच्या रुपाने दिले जाईल.

पगाराव्यतिरिक्त काय आहेत या नोकरीतून मिळणारे फायदे?
रेल्वे दरवर्षी हजारो लोकांना नोकरीची संधी देते आणि अधिकाधिक लोक यासाठी अर्ज करतात जेणेकरून एका चांगल्या नोकरीसह सुरक्षित भविष्यही मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त DA, HRA, ट्रान्सपोर्ट अलाऊंन्स, निवृत्तीवेतन तरतूदी, मेडिकल बेनेफिट्सही देण्यात येतील.

 

News English Summary: RRB NTPC Recruitment 2020 is out to recruit 35,208 vacancies for the posts of Non-Technical Popular Categories (NTPC) i.e. Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Junior Time Keeper, Trains Clerk, Commercial cum Ticket Clerk, Traffic Assistant, Goods Guard, Senior Commercial cum Ticket Clerk, Senior Clerk cum Typist, Junior Account Assistant cum Typist, Senior Time Keeper, Commercial Apprentice and Station Master in various Zonal Railways and Production Units of Indian Railways.

News English Title: RRB NTPC Recruitment 2020 Exam Date and Application Status Out Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x