29 January 2025 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

Sarkari Naukri | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर, या सरकारी बँकेत 1000 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा

Sarkari Naukri

Sarkari Naukri | भारतातील सर्वात नावाजलेली दिग्गज बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडियाने ‘लोकल बँक ऑफिसर’ च्या पदांसाठी बंपर भरती काढली आहेत. 1000 हजाराहून अधिक भरती काढून नोकरी शोधणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही सुद्धा बँकेत नोकरी करण्यास उत्सुक असाल त्याचबरोबर तुम्ही बँकिंग क्षेत्रांमध्ये शिक्षण घेतलेलं असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी. बँकेत रिक्त पदांना किती पगार मिळणार, त्याचबरोबर कामाची पात्रता काय असेल सर्व गोष्टी जाणून घेऊ.

1000 पेक्षा अधिक पदांसाठी भरती :
युनियन बँक ऑफ इंडियाने लोकल बँक ऑफिसरच्या पदांसाठी 1000 पेक्षा जास्त भरती काढली आहे. यामध्ये जनरल कॅटेगिरीसाठी 613 पदे, एसटीसाठी 109 आणि एससी कॅटेगिरीसाठी 224 पदे काढली आहेत. त्याचबरोबर ओबीसीसाठी 404, इडब्ल्यूएस पदासाठी 105 पद राखीव ठेवली आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर, शेवटची तारीख 13 नोव्हेंबर देण्यात आली आहे.

अप्लाय करण्याची सोपी पद्धत :
1. भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर, सर्वप्रथम unionbankofindia.co.in या वेबसाईटवर जावं लागेल. इथे तुम्हाला स्वतःचं लॉगिन करून घ्यायचं आहे.

2. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला जॉब ऑप्शन विचारण्यात येईल. तुम्हाला हव्या त्या जॉब ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर फॉर्ममध्ये असलेले सर्व डिटेल भरून घ्यायचे आहेत.

3. त्यानंतर तुमच्याकडे मागितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहेत. कागदपत्रांमध्ये गडबड तर नाही ना हे चेक करायचं आहे आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट देखील करायचं आहे.

4. पेमेंट आणि भरलेला फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्मची हार्ड कॉपी स्वतः जवळ ठेवायची आहे.

पात्रता जाणून घ्या :
युनियन बँकेत निघालेल्या बंपर भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी तुमचं वय 20 ते 30 वर्ष असणे गरजेचे आहे. बरोबर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लिट असणे गरजेचे आहे आणि हे ग्रॅज्युएशन तुम्ही एका विश्व महाविद्यालयातून केलेले असावे.

फॉर्मची फी किती असेल :
समजा तुम्ही ईडब्ल्यूएस किंवा जनरल कॅटेगिरीतून असाल तर, तुमच्यासाठी फॉर्म एप्लीकेशन फी 850 रुपये असेल. एसएससी आणि एसटी वर्गासाठी फॉर्म एप्लीकेशन फी 175 रुपये असणार आहे. आम्ही सांगितलेल्या सर्व अधिकृत माहितीचा आढावा घेऊन तुम्ही लवकरात लवकर नोकरीसाठी अप्लाय करू शकता.

Latest Marathi News | Sarkari Naukri 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x