17 April 2025 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा

Sarkari Naukri

Sarkari Naukri | सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. सध्या तरुणवर्गात सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्पर्धा सुरू आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही भरती वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिकेमधील भरती प्रक्रियाची जाहिरात प्रसारित करण्यात आली असून अनेक तरुण अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 12 उत्तीर्ण तरुण त्याचबरोबर डिप्लोमा पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या रिक्त पदांसाठी भरती काढली आहे.

भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील जाणून घ्या :

ठाणे महानगरपालिकेत निघालेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 69 या वयोगटादरम्यान असणे गरजेचे आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असून 11 महिने आणि 29 दिवस भरती प्रक्रियेचा कालावधी असणार आहे.

भरती प्रक्रियेसाठीची पात्रता जाणून घ्या :

ठाणे महानगरपालिकेत निघालेल्या भरतीसाठी उमेदवाराजवळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस पदवीतून शिक्षण पूर्ण केलेले असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळी तंत्रज्ञ या पदासाठी उमेदवाराजवळ 12 वी उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

भरतीसाठी एकूण जागा किती :

ठाणे महानगरपालिकेत एकूण 42 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरती ठाणे महानगरपालिकेत असल्यामुळे तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची एक अतिशय सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर इच्छुक तरुणांनी अर्ज प्रक्रियेस सुरुवात करावी. या भरतीची आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला https://www.thanectiy.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. तुम्हाला या वेबसाईटवरच अर्ज प्रक्रियेची देखील संपूर्ण माहिती मिळेल.

अर्जाची शेवटची तारीख त्याचबरोबर वेतनश्रेणी काय असेल जाणून घ्या :

अर्ज प्रक्रियेनुसार निवड झालेल्या तरुणांना वेतनश्रेणी 17000 ते 60 हजार रुपये दरमहा मिळणार आहे. त्याचबरोबर या अर्जाची शेवटची तारीख 2024 चा शेवटचा महिना डिसेंबरची 17 तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पटापट अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी आणि सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळवावी.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Sarkari Naukri Sunday 15 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या