6 January 2025 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले
x

SBI Bank Naukri | तरुणांनो घाई करा, SBI बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख - Marathi News

SBI Bank Naukri

SBI Bank Naukri | एसबीआय ही भारत देशामधील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या बँकांच्या यादीमधील प्रथम क्रमांकावर असणारी बँक आहे. महत्त्वाचं म्हणजे ही भारताची सरकारी बँक आहे. सरकारच्या एसबीआय बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न अनेक तरुण तरुणींचा असतं. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

काय आहे अर्जाची शेवटची तारीख :

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या 27 तारखेपासून सुरू झाली आहे दरम्यान शेवटची तारीख डिसेंबर महिन्याच्या 17 तारखेपर्यंत दिली गेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी.

पद आणि जागा किती :

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रमुख पदांसाठी 4 रिक्त जागा, टीम लीडसाठी 9 रिक्त जागा आणि रिजन हेडसाठी 10 रिक्त जागांची भरती काढण्यात आली आहे.

उमेदवाराची पात्रता :

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त जागा भरण्याकरिता उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असायला हवे. त्याचबरोबर सेंट्रल रिसर्च टीम या पदासाठी उमेदवाराजवळ अर्थशास्त्र, वाणिज्य, वित्त, CA CFA व्यवसाय प्रशासनात ग्रॅज्युएशन पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.

किती शुल्क आकारण्यात येईल :

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या भरती प्रक्रियेसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवाराने कोणत्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही आहेत. परंतु इतर प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागणार आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज :

1. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्ज प्रक्रियेसाठी सर्वप्रथम sbi.co.in या वेबसाईटवर जा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला करिअर टॅब म्हणून ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा.

2. तुमच्यासमोर एसबीआय SCO रिक्वायरमेंट 2024 असे नोटिफिकेशन येईल. या नोटिफिकेशनवर क्लिक करा.

3. संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर फॉर्म भरून घ्या आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स अर्जाला जोडून घ्या.

अशी होणारा निवड प्रक्रिया :

पात्र उमेदवाराची निवड सीटीई आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांची परीक्षा एकूण शंभर गुणांची असणार आहे. ज्या उमेदवाराचा स्कोर चांगला असेल अशा उमेदवारांची एक मेरिट लिस्ट बनवली जाईल. त्यानंतर योग्य निवड प्रक्रिया केली जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Bank Naukri 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI Bank Naukri(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x