24 November 2024 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

SBI Clerk 2021 Admit Card | SBI जम्बो भरती | अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करा

SBI Clerk Recruitment 2021

मुंबई, १५ ऑगस्ट | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) क्लार्क पदावरील भरतीसाठीच्या परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी करण्यात आलं आहे. एसीबीआयमध्ये क्लेरिकल कॅडरच्या ज्युनिअर असोसिएट पदावर ५ हजाराहून अधिक जागांवर भरती केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांना बँकेच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. एसबीआयकडून जारी करण्यात आलेल्या या भरतीसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २७ एप्रिल २०२१ पासून सुरू झाली होती. यात उमेदवारांना २० मे पर्यंतचा वेळ देण्यात आला होता.

बँकेतील भरतीसाठीचं अॅडमिट कार्ड १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तातडीनं संकेतस्थळाला भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद आणि नाशिक येथील परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

एसबीआय क्लर्क भरतीसाठीचं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी sbi.co.in या वेबसाइट्सवर भेट द्यावी. यात SBI Clerk Prelims Admit Card 2021 या पर्यायावर क्लिक करा. यावर विचारण्यात आलेली सर्व माहिती उमेदवारांनी भरावी. लॉगइन करताच अॅडमिट कार्ड ओपन होईल. ते डाऊनलोड करुन तुम्हाला त्याची प्रिंट काढता येईल. बँकेची परीक्षा दोन टप्प्यात केली जाते. यात उमेदवाराला सर्वात आधी प्रीलिम्स परीक्षा द्यावी लागते. त्यात निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोरं जावं लागतं. एसबीआयच्या क्लार्क पदासाठी मुलाखत घेतली जात नाही.

प्रीलिम्स परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो. त्यानुसार १०० गुणांचा पेपर तयार केला जातो. यात इंग्रजी भाषेवर ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूटचे ३५ प्रश्न आणि रिजनिंग अॅबिलिटी संदर्भात ३५ प्रश्न विचारले जातात. यासाठी एकूण ६० मिनिटांचा अवधी दिला जातो. मुख्य परीक्षेसाठी ४० मिनिटांचा अवधी असतो. यात १९० प्रश्न विचारले जातात. एकूण २०० गुणांचा पेपर असतो. याच चार विभाग केलेले असतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: SBI Clerk Recruitment 2021 Admit Card download news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x