Sarkari Naukri | महाराष्ट्रात ६००० शिक्षणसेवक पदांसाठी भरती

मुंबई, ९ डिसेंबर: कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणांमावर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी शिक्षण सेवक पदभरतीस बंदी घालण्यात आली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीव्दारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली आहे, असा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे ‘पवित्र’ शिक्षक भरती पुन्हा होणार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील जवळपास १२ हजार १४० शिक्षण सवेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने ही पदभरती होत आहे. मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी पाच हजार ८२२ उमेदवारांची यापूर्वीच निवड करण्या आली होती. मात्र त्यांची नियुक्ती रखडली होती. त्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. उर्वरित जागांवरील भरतीसाठी ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियासुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मा.उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होतआहे. pic.twitter.com/0d9vmt2K1f
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) December 8, 2020
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ३ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शासन निर्णयान्वये घालण्यात आलेल्या पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षणं सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
News English Summary: Shikshan Sevak Recruitment 2020 notification released free job alert. The recruitment of Shikshan Sevak was banned to take financial measures on the impact of the corona on the economy. However, as per a decision taken in a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar on December 3, the process of recruitment of Shikshan Sevak through the Pavitra software has been excluded from the recruitment ban, state government cell officer Kavita Tonde announced on Monday. So it is clear that ‘Pavitra’ Shikshan Sevak recruitment 2020 is about to begin again.
News English Title: Shikshan Sevak Recruitment 2020 notification released free job alert news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल