5 November 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

UPSC Prelims Exams 2020 | परीक्षा पुढे ढकलणे अशक्य | आयोगाची न्यायालयात माहिती

UPSC Prelims exams 2020, Postponed, Supreme Court, UPSC Exam

नवी दिल्ली, २८ सप्टेंबर : यूपीएसी पूर्व परीक्षा (UPSC Prelims Exams 2020) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

परीक्षांचं सुधारित वेळापत्रक (UPSC Prelims Exams 2020) जाहीर झालं असून, ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं न्यायालयाला सांगितलं. परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवारी अर्थात ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

 

News English Summary: The three judge bench of the Supreme Court today posted the matter of postponement of UPSC Prelims exams 2020 till Wednesday. Union Public Service Commission (UPSC) had told the Supreme Court that it’s impossible to defer Civil Services exams any further. UPSC was asked by Supreme Court to file an affidavit by tomorrow. Supreme Court was hearing a plea filed by UPSC aspirants, seeking postponement of upcoming Civil Services (prelims) Exam’20. Sarkari Naukri result on Maharashtranama. Admit Card download on Maharashtranama.

News English Title: UPSC Prelims exams 2020 can not be postponed due to COVID 19 UPSC tells Supreme Court Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UPSC(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x