14 November 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
x

UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे

UPSC Requirement 2024

UPSC Requirement 2024 | केंद्र सरकार विविध नोकरीच्या पदांसाठी वेळोवेळी भरती जाहीर करत असते. दरम्यान 2024 च्या भरतीसाठी संघ लोकसेवा आयोग यूपीएससीने एक अनोखी भरती काढली आहे. या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाहीये. म्हणजेच परीक्षा न देता देखील तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता. जाणून घ्या या भरती विषयी संपूर्ण माहिती.

कोणत्या पदासाठी निघाली आहे भरती :

यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार असिस्टंट प्रोग्रामरच्या पदांकरिता भरती काढण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या 9 तारखेपासून सुरू झाली आहे. दरम्यान या अर्जाची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर दिली गेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या स्वप्नातल्या नोकरीसाठी अर्ज करावा. असिस्टंट प्रोग्रामरची भरती भारत देशाची सर्वात मोठी एजन्सी सीबीआयकरिता काढण्यात आली आहे.

भरतीसाठीची योग्यता :

असिस्टंट प्रोग्रामरची नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही महाविद्यालयाकडून मान्यताप्राप्त मास्टर इन कंप्यूटर एप्लीकेशन, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, कंप्युटर सायन्स, बॅचलर ऑफ इंजीनियरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी त्याचबरोबर मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायन्स कम्प्युटर टेक्नोलॉजी यामधील कोणतीही एक डिग्री असणे गरजेचे आहे.

भरतीसाठी वयाची अट काय :

या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता आर्थिक आणि सामान्य रूपाने मागे असणाऱ्या व्यक्तींना 30 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आली आहे. तर, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 33 वर्ष वाढवून दिले आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती असलेल्या उमेदवारांना वयाची अट 35 वर्ष देण्यात आली आहे.

परीक्षा न देता मिळवा नोकरी :

अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अभ्यर्थ्यांना 25 रुपये भरावे लागतील. दरम्यान एससी, एसटी महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी देण्यात आली नाहीये. त्यांना मोफत अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना डायरेक्ट. इंटरव्यूसाठी बोलवण्यात येईल हा इंटरव्यू डॉक्युमेंट वेरिफिकेशननुसार करण्यात येईल.

Latest Marathi News | UPSC Requirement 2024 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#UPSC Requirement 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x