15 January 2025 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज

Zilla Parishad Job

Zilla Parishad Job | कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या तरुणांचं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या कोल्हापूरमधील जिल्हा परिषदेमध्ये नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. कालपासूनच या भरती प्रक्रियेची अर्ज तारीख ओपन झाली असून बहुतांश तरुण मंडळी भरतीसाठी अर्ज करत आहेत.

कोणत्या पदासाठी जाहीर भरती :

कोल्हापूर जिल्हा परिषदेत डेटा एन्ट्री या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती शिक्षण विभागाचे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेद्वारे भरती राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली असून लाखोंच्या संख्येने तरुणवर्ग फॉर्म भरत आहेत.

भरतीसाठीची पात्रता :

बऱ्याच तरुणांना असं वाटतं की, सरकारी नोकरी म्हणजे स्पर्धा परीक्षा. केवळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे व्यक्ती आणि तरुण मंडळीच जिल्हा परिषद किंवा नगरपरिषदेचे फॉर्म भरू शकतात. परंतु इथे केवळ 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी देखील अर्ज प्रक्रियेसाठी पात्र आहे. अर्जदार 12 वी ते 15 वी पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उमेदवारा जवळ मराठी तसेच इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूरमधील जिल्हा परिषदेत निवड झालेल्या उमेदवाराला सुरुवातीलाच 25 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.

अर्जाची शेवटची तारीख काय :

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2024 म्हणजेच कालपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर संधीचा फायदा घ्यावा. भरती प्रक्रियेसंबंधितची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

ऑफलाइन पद्धतीने देखील करता येईल अर्ज :

ज्या उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल त्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक येथे अर्ज पाठवून द्यायचा आहे. अर्जाबरोबर 10 वी 12 वी तसेच एमएससीआयटी आणि टायपिंगचे सर्व सर्टिफिकेट अटॅच करून अर्ज पाठवून द्यायचा आहे.

Latest Marathi News | Zilla Parishad Job Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Zilla Parishad Job(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x