20 April 2025 7:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

शेतकऱ्यांना 90% टक्के अनुदानावर शेती अवजारे मिळणार | करा अर्ज, ही आहे शेवटची तारीख

Sarkari Yojana

मुंबई, १७ जुलै | जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून 31 जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर योजनांमधून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर शेती उपयोगी अवजारे व साहित्य मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात अली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे, पेरणी व लागवड यंत्रे, पीक संरक्षण औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

सेस फंडातून निधीची मागणी केली होती. त्यानुसार या आर्थिक वर्षासाठी कृषी विभागाने योजना राबविण्यासाठी कंबर कसली असून शेतकऱ्यांकडून 14 जुलै पासून 31 जुलैपर्यंत. अर्ज मागविण्यात आले आहेत आणि त्यामुळे अर्ज करण्यासाठी त्वरा करा. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या योजनांसाठी अर्ज मागविले:
* शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप पुरविणे.
* शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोयाबीन स्वच्छ करण्यासाठी स्पायरल सेपरेटर, ग्रेडर पुरविणे.
* शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्‍प्रेअर पुरविणे.
* शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर प्लास्टीक ताडपत्री 450 जीएसएम पुरविणे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Farmers will get agricultural implements on 90% subsidy Sarakri Yojana 2021 Maharashtra news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या