9 January 2025 8:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

घरबसल्या वय, राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं? - असा करा अर्ज

Online Domicile certificate process in Marathi

मुंबई , ०९ जुलै | राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) देण्यात येते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असते. पूर्वी राज्यातील कोर्टांमध्ये मिळणारे हे प्रमाणपत्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयात, तर सरकारतर्फे सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रात ऑफलाइन आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते.

वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र कुठे मिळते?
वय ,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे:

ओळखीचा पुरावा (Identity Card): (यापैकी एक कागदपत्रं)
* पॅन कार्ड
* पासपोर्ट
* आधारकार्ड
* मतदान कार्ड
* रोजगार हमी योजना ओळखपत्र
* ड्रायव्हिंग लायसन्स
* फोटो
* सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र

पत्ता दर्शवणारा पुरावा (Address Proof) (यापैकी एक कागदपत्रं)
* पासपोर्ट
* आधारकार्ड
* मतदान कार्ड
* रेशन कार्ड
* पाणी बील
* ड्रायव्हिंग लायसन्स
* फोटो
* वीज बील
* घरफळा पावती
* सातबारा किंवा 8 अ उतारा

अर्जदार 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचं डोमासाईल प्रमाणपत्र, शाळा प्रवेशाचा पुरावा,

रहिवासी दाखला:
तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून घेतलेला रहिवासी दाखला वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असतो.

स्वंयघोषणापत्र:
डोमासाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधी मंजूर होईल आणि तुम्हाला वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळून जाईल.

आपले सरकार पोर्टलवर अर्ज कसा करायचा?
1) आपले सरकारवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ पोर्टलवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या.
2) लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा.
3) त्यातून पुढे महसूल सेवा निवडा.
4) तिथून पुढे वय, राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल प्रमाणपत्र हा पर्याय निवडा
5) पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या
6) त्याप्रमाणं ती तयार ठेवा, कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.
7) तिथुन पुढील वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.
8) 18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर लाभार्थ्याची माहिती तिथे माहिती सादर करावी.
9) अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा.
10) फोटो आणि सही देखील अपलोड करावेत.
11) यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा.
12) जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

15 दिवसांमध्ये प्रमाणपत्र:
आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.

हेल्पलाइन आणि अधिक माहितीसाठी:
महाऑनलाइनद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास [email protected] या ईमेल आयडीवर किंवा ०२२-६१३१६४०० या क्रमाकांवर संपर्क साधता येणार आहे.

 

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Age Nationality and Domicile certificate online through Aaple Sarkar portal in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x