22 November 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

तरुणांनो, सरकारच्या मध केंद्र योजनेचा फायदा घेण्यासाठी मंडळाकडे अर्ज कसा कराल? - वाचा माहिती

Beekeeping Development center scheme

मुंबई, २० जुलै | मध केंद्र योजना करिता अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळच्या वतीने करण्यात आले आहे. शेती करत असतांना केवळ शेतीच्या भरवशावर अवलंबून राहिलात तर शेतीमध्ये नुकसान होण्याची शक्यात असते त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय केला तर नक्कीच शेती फायद्याची होऊ शकते. शेतकरी बंधुंनो शेतीपूरक व्यवसाय म्हटले कि लगेच आपल्या डोळ्यासमोर दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन योजना विषयी चित्र निर्माण होते. मित्रांनो दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालन हे व्यवसाय फायद्याचे असले तरी देखील इतरजन करतात म्हणून आपणही तोच व्यवसाय करावा हि काही मोठी बाब नाही.

मध केंद्र सुरु करून नफा कमविण्याची संधी:
शेतकरी बंधुंनो तुम्ही जर का वेगळ्या विचाराचे असाल शेतीव्यवसायामध्ये काहीतरी नवीन करू इच्छित असाल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो मधुमक्षिका पालन या व्यवसायच खूप चांगला स्कोप निर्माण होत आहे. मित्रांनो मध हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. चांगले मध विदेशात निर्यात खूप चांगला नफा मिळविता येवू शकतो. त्यामुळे शेतीमध्ये असे हटके व्यवसाय केल्यास नक्कीच शेतकऱ्यांची प्रगती होईल यात शंका नाही.

मध संकलन करण्यासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध:
मधुमक्षिका पालन व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध योजना असतात. त्यापैकीच हि एक योजना म्हणजेच मध केंद्र योजना होय. योजनांचा लाभ घेवून देखील तुम्ही तुमचा मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु करू शकता. मित्रांनो तुम्हाला मधुमक्षिका पालन व्यवसाय जमत नसेल तरी देखील तुम्ही मधपाळ केंद्र चालू करून नफा मिळवू शकता किंवा जमा केलेल्या माधवर प्रक्रिया करून चांगला नफा कमवू शकता.

मध संकलन योजना संदर्भातील बातमी बघा:
शेतकरी बंधुंनो दिनांक १६ जुलै २०२१ च्या दैनिक वर्तमान पत्रामध्ये मध केंद्र योजनेसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर मध केंद्र योजनेसाठी शासकीय अनुदान हवे असेल तर लगेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधा. सदरील वृत्तपत्रातील बातमी बघण्यासाठी खालील बाटणार क्लिक किंवा टच करा.

सदर बातमी येथे वाचा अथवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करून वाचा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/batmi.jpg

मध संकलन योजना संदर्भातील संदर्भातील यादी डाउनलोड करा:
मित्रांनो मध केंद्र योजना संदर्भात संपर्क साधण्यासाठी खालील PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. तुम्ही जर जालना जिल्ह्याबाहेरील असाल तरी देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधून या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्या. या ठिकाणी एक pdf दिलेली आहे या pdf मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सर्व पत्ते आणि संपर्क नंबर दिलेले आहेत. तुमच्या जिल्ह्याच्या संबधित अधिकारी साहेबांशी या योजनेसंदर्भात माहिती जाणून घ्या. व योजनेचा लाभ घ्या.

संपर्क यादी पुढील लिंक वर वाचू शकता: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/मधुमक्षिका-संपर्क-यादी.pdf

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Beekeeping Development center scheme in Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x