जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर
मुंबई, २० जुलै | जन्म-मृत्यूचा दाखला आता ऑनलाइन पद्धतीने जगात कुठेही मिळू शकेल. सुमारे 80 लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन देण्याचा मार्ग खुला होणार आहे. देश-विदेशांतील मुंबईकरांना जन्म-मृत्यू दाखला सहजपणे मिळू लागेल. प्रमाणपत्रे ऑनलाइन देताना या सर्व प्रमाणपत्रांवर “क्यूआर कोड’ (क्विक रिस्पॉन्स कोड) नमूद केला जाईल. त्यामुळे या प्रमाणपत्रांची अधिकृतता ऑनलाइन पद्धतीनेच तपासता येईल. त्याअंतर्गत जन्म-मृत्यूविषयक प्रमाणपत्रावरील “क्यूआर कोड’ ऍण्ड्रॉईड आधारित भ्रमणध्वनीमधील “क्यूआर कोड रीडर’ या ऍपच्या साह्याने कॅमेऱ्याद्वारे स्कॅन केल्यास भ्रमणध्वनीवर इंटरनेट ब्राऊजरवर संबंधित संकेतस्थळावरील प्रमाणपत्राचे पान उघडले जाईल.
जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती:
* जन्म नोंद दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
* त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
* आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
* त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.
* हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
* त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “जन्म नोंद दाखला” या पर्यायावर क्लिक करायचे आहे..
जन्म नोंद दाखला-अर्जदाराची माहिती:
* अर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), जन्म तारीख, आधार क्रमांक, हि सर्व माहिती टाकायची आहे. व “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
* समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल “तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला” आहे.व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.
* तसेच त्या मॅसेज मध्ये शुल्क भरा हा ऑपशन येईल, जन्म नोंद दाखला काढण्यासाठी २३.६० एवढे शुल्क आकारले जाते,ते शुल्क तुम्ही Wallet ,Net Banking, Credit /Debit Card ,IMPS ,UPI या माध्यमातून भरू शकता.
* शुल्क भरल्यानंतर तुम्हाला 5 दिवसातच जन्म नोंद दाखला आपले सरकार या वेबसाइट वर मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to apply for birth certificate online in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL