23 January 2025 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

तरुणांनो... स्वतःच्या CSC सेंटरसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल? | या आहेत स्टेप्स

How to apply for CSC center online

मुंबई, २३ जुलै | भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या महाराष्ट्रात राज्यमध्ये CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून दिल्या जातात.

CSC सेंटरची वैशिष्ट्ये:
* भारतातील लाखो युवा बेरोजगारांना उत्पन्न मिळवण्याची संधी दिली गेली आहे.
* सीएससी द्वारे विविध प्रकल्प राबवून देशाला पूर्ण पणे ऑनलाईन जोडण्याचे काम करत आहेत.
* गावातील लोकांना विविध सरकारी योजना आणि विविध सरकारी दाखले संदर्भातील कामे एकाच ठिकाणी केली जातात.
* अनेक लोक सीएससी (CSC) सेंटर घेण्यासाठी इच्छुक होते परंतु त्यासाठी नोंदणी चालू नसल्याने नाराज होते परंतु आता पुन्हा देशात
* सीएससी रजिस्ट्रेशन (CSC Digital Seva Registration) चालू झाले आहे परंतु या वेळी तुम्हाला काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

आता भारत सरकारच्या नवीन नियमणूसार आपणास CSC (सीएससी) साठी अर्ज करताना TEC (Telecentre Entrepreneur Course) सर्टिफिकेट आवश्यक आहे त्या शिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाही. आपण स्वता यासाठी अर्ज करून घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देवून सर्टिफिकेट प्राप्त करू शकता.

CSC सेंटर साठी पात्रता:
* TEC सर्टिफिकेट (नवीन नियमांनुसार आवश्यक)
* आधार कार्ड
* पॅन कार्ड
* कम्प्युटर हाताळण्याचे चे सामान्य ज्ञान
* कमीत कमी 10 वी पास असावा
* वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत

CSC सेंटर साठी आवश्यक कागदपत्रे:
* अर्जदारचा फोटो
* Proof Of Identity Card
* Proof of Address
* कॅन्सल बँक चेक
* पॅन कार्ड कॉपी

CSC सेंटर साठी आवश्यक साहित्य:
* डेस्कटॉप /लॅपटॉप कम्प्युटर
* कलर प्रिंटर
* वेब कॅमेरा
* स्कॅनर
* इंटरनेट कनेक्शन

अर्ज करण्यापूर्वी खालील महत्वाच्या सूचना अवश्य वाचा:
* अर्जदारचा फोटो हा 10 ते 25 KB पर्यंत साईजचा असावा.
* आधार कार्ड 80 KB पर्यंत साईजचा असावा.
* कॅन्सल चेकची साईज पण 80 KB पर्यंत असावी.
* सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवावीत.
* आधार नंबरला मोबाइल नंबर व ईमेल आयडी लिंक असणे आवश्यक आहे.
* बँक अकाऊंट असणे आवश्यक आहे.

CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज:
* CSC सेंटर साठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करताना सर्व प्रथम CSC (सीएससी) ची अधिकृत वेबसाइट https://register.csc.gov.in/ ओपन करा.
* तिथे आपणास मुख्य मेनू मध्ये Apply हा टॅब दिसेल त्यावर क्लिक करून आपण New Registration हा पर्याय निवडावा.
* आता CSC नोंदणी पेज ओपन होईल त्यामध्ये आपणास तिथे खालील तीन प्रकारची Registration पर्याय दिसतील.

CSC VLE
SHG (Self Help Group)
RDD

* हे सर्व पर्याय विविध लोकांसाठी आहेत .आपण वैयक्तिक अर्ज करणार असल्याने यातील पहिला CSC VLE हा प्रकार आपण निवडावा. इतर पर्याय हे बचत गट व शासकीय कार्यालये यांचे CSC Registration करण्यासाठी आहेत.

* आपण CSC VLE हा पर्याय निवडल्यावर आपणाला TEC Certificate मोबाईल नंबर कॅपच्या कोड टाकून आपण सबमिट करावे.

* पुढे आपणास आधार द्वारे प्रमाणीकरण करावे लागते यात आपण आधार बायोमाट्रिक ,आधार वर असलेल्या मोबाईल नंबर वर पाठवलेल्या OTP नंबर च्या मदतीने आपण आधार प्रमाणीकरण करा.

* CSC नोंदणी अर्जात पुढे आपणास आपली जी आवश्यक माहिती विचारली जाते ती भरा व आपणास फोटो,आधार कार्ड, कॅन्सल चेक अपलोड करावी लागतात या मध्ये आपणास आपल्या सेंटर चे लोकेशन Longitude And Latitude च्या मदतीने दाखवावे लागते.

* सर्व माहिती भरल्यावर आपन अर्ज सबमीट केल्यावर आपणास एक Application Reference Number मिळेल या नंबर च्या मदतीने आपल्या अर्जाची स्थिति आपण तपासू शकता व आपला अर्ज मान्य केला, की कोणत्या कारणाने अमान्य केला याची स्थिति आपण जाणून घेवू शकता.

CSC नोंदणी अर्जाची स्थिती तपासा:
आपण सीएससी सेंटर साठी नोंदणी अर्ज केल्यावर आपल्याला एक Application Reference Number मिळेल तो जपून ठेवावा. आपल्या अर्जाची स्थिति तपासण्यासाठी https://register.csc.gov.in/register/status या लिंक वर जावून आपला Application Reference Number व Captcha टाकून आपल्या अर्जाची स्थिति जाणून घेवू शकता.

CSC ID आणि Password:
आपला CSC नोंदणी अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला आधार Register ईमेल ID वर आपणास माहिती दिली जाईल त्यात आपणास DigiMail Credentials मिळतील त्या आधारे आपण आपले तयार झालेले अकाऊंट पाहू शकता.

DigiMail Open करून आपण आपला CSC ID आणि CSC Password (Digital Seva Credentials) पाहू शकता.या DigiMail मध्ये आपणाला सीएससीच्या विविध कार्यक्रमाची माहिती मेलच्या आधारे मिळत जाईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for CSC center online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x