महत्वाची माहिती | शेत जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ? - वाचा सविस्तर
मुंबई, २० जुलै | आज आपण जाणून घेणार आहोत ते शेत जमीन मोजणी अर्ज संबधी. शेत जमीन मोजणीसाठी ऑफलाईन अर्ज व ऑनलाइन अर्ज संदर्भात बऱ्याच शेतकरी बांधवांना या लेखामुळे नक्कीच फायदा होणार आहे. शेत जमीन मोजणी अर्ज कसा करतात तो अर्ज कोठून डाउनलोड करावा, त्याची प्रिंट कशी काढावी आणि तो अर्ज कोणाकडे सादर करावा हि संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शेत मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपले सरकार या वेबसाईटवर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन कसे करावे हे बघणार आहोत. तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर नवीन युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी नोंदणी कशी करावी या संदर्भात अगदी तपशीलमध्ये माहिती सांगणार आहे.
शेताचा बांध:
शेतीमध्ये सर्वात जास्त भांडण होण्याचे जे कारण आहे ते म्हणजे शेताचा बांध होय, शेताच्या बांधामुळे शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात वाद होण्याची शक्यता असते त्यामुळे जमिनीची मोजणी होऊन आपापल्या शेतातील बांध निश्चित निश्चित केल्यास शेतातील वाद कमी होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी शेत जमीन मोजणी अर्ज विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेत जमीन मोजणी अर्ज असा डाउनलोड करा:
सर्वात अगोदर ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया कशी असते ते जाणून घेवूयात ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास एक अर्ज सादर करावा लागतो. अर्ज कसा असतो हे आता आपण जाणून घेवूयात शेतजमीन मोजणीचा हा अर्ज तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करायचा असेल तर महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर हा अर्ज उपलब्ध आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
शेत जमीन मोजणी अर्ज प्रिंट किंवा डाउनलोड करा:
* शेत जमीन मोजणी अर्ज डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइलच्या ब्राउजरमध्ये टाईप करा https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/
* त्यानंतर सर्च करा तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाराष्ट्र राज्य भूमीअभिलेख विभागाची वेबसाईट ओपन होईल.
* त्यानंतर निळ्या रंगाच्या पट्टीवरील डाऊनलोड या बटनावर क्लिक करा.
* शेत जमीन मोजणी अर्ज डाउनलोड करण्नयासाठी मोजणी अर्ज नमुना या बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर हा शेत जमीन मोजणी अर्ज तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर किंवा मोबाईलवर मोजणी अर्ज दिसेल.
* तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेले असेल तर प्रिंट या बटनावर क्लिक करताच हा शेत जमीन मोजणी अर्ज प्रिंट होईल किंवा तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर फोल्डर या बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर हा अर्ज तुमच्या मोबाईलअध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड होईल.
भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
* गुगलमध्ये टाईप करा https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/
* भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. य
* वेबसाईटच्या निळ्या रंगाच्या नेव्हिगेशन बारवरील डाउनलोड बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर मोजणी या लिंकवर क्लिक करा.
* मोजणी अर्ज या बटनावर क्लिक करा आणि हा अर्ज तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये डाउनलोड होईल
या अर्जातील माहिती व्यवस्थित भरून तुम्ही तुमच्या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयास सादर करू शकता.
आता जमीन मोजणीसाठी ओनलाइन अर्ज कसा करावा हे आपण जाणून घेवूयात.
शेत जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली:
तुमच्या कॉम्प्युटरमधील गुगलमध्ये टाईप करा आपले सरकार. आपले सरकार हि सरकारी वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा लोगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे. मित्रांनो आपले सरकार या वेबसाईटवर कोणताही सामान्य व्यक्ती नोंदणी करू शकतो, त्यासाठी तुमच्याकडे कोणताही विशेष आयडी असणे गरजेचे नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना अजूनही वाटते कि आपले सरकार वेबसाईटवर कोणताही फॉर्म भरण्यासाठी CSC सारखा आयडी असेल तरच आपले सरकार या वेबसाईटवरील योजनांचा लाभ घेता येते. परंतु या ठिकाणी सामान्य व्यक्ती देखील नवीन नोंदणी करून लॉगीन आय डी आणि पासवर्ड तयार करून लॉगीन करू शकतात आणि आपले सरकार योजनांचा लाभ घेऊ शकतात.
जर तुमच्याकडे आपले सरकार या वेबसाईटवर लॉगीन करण्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड नसेल नवीन युजर नोंदणी खालीलप्रमाणे करावी.
आपले सरकार नोंदणी प्रक्रिया:
* नवीन युजर येथे नोंदणी करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
* UID किंवा self details या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडा.
* त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सर्व तपशील भरा.
* कागदपत्रा आधारे अर्जदाराचा पत्ता भरा.
* मोबाईल नंबर टाका युजरनेम आणि पासवर्ड निवडा.
* त्यानंतर अर्जदारांनी स्वतः फोटो अपलोड करा.
* ओळखपत्रासाठी दिलेल्या यादीमधून एक कागदपत्र अपलोड करा.
* रहिवासीसाठी दिलेल्या यादीमधून एक कागदपत्र अपलोड करा.
* त्यानंतर रजिस्टर करा.
अशा पद्धतीने या ठिकाणी नोंदणी केल्यावर तुम्हाला लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळेल तो लॉगीन आयडी, पासवर्ड, कॅपचा कोड आणि तुमचा जिल्हा निवडणून या ठिकाणी लोगिन करायचे आहे.
आपले सरकार लॉगीन प्रक्रिया:
* लॉगीन केल्यानंतर असा dashboard तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरील डाव्या बाजूला विविध बिभागांची नावे दिसेल.
* ज्या विभागाच्या सेवेचा तुम्हाला लाभ घ्यावयाचा आहे तो विभाग या ठिकाणी तुम्ही निवडू शकता.
* या ठिकाणी तुम्ही जो हि ऑनलाइन अर्ज सादर केला असेल त्याची सद्यस्थिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता.
* शेत जमीन मोजणी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी महसूल हा विभाग निवडावा लागेल महसूल विभाग निवडल्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय तुम्हला दिसतील, महसूल सेवा आणि भूमीअभिलेख सेवा.
* भूमी अभिलेख सेवा या पर्यायावर क्लिक करा जसे तुम्ही भूमी अभिलेख सेवा या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला अजून बरेच पर्याय या ठिकाणी दिसेल यापैकी
* अतितातडी प्रकरणे.
* अति अति तातडी प्रकरणे.
* तातडी प्रकरणे.
साधी प्रकरणे:
असे चार पर्याय शेत जमीन मोजणीसाठी तुम्हाला दिसेल या पैकी जो हि पर्याय तुम्हाला निवडायचा असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता.
उदाहरणार्थ मोजणी प्रकरणे:
* iii)साधी प्रकरणे या पर्यायावर क्लिक करा
* वरती दिसणाऱ्या पुढे जा या नारंगी बटनावर क्लिक करतो.
* पुढे जा या बटनावर क्लिक करताच महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल
* या ठिकाणी तुम्ही अगोदरच लॉगीन असल्यामुळे परत एकदा लोगिन करण्याची आवश्यकता नाही.
* तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या डाव्या बाजूच्या पर्यायावरील Measurment Case – iii) Ordinary Cases या पर्यायावर क्लिक करा.
* त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तपशील भरायचे आहेत जसे कि अर्जदाराचे नाव, मराठी आणि इंग्रजी, रस्ता, महत्वाची खून, परिसर प्रभाग, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, त्यानंतर पिनकोड, मोबाईल नंबर, इमेल, आधार नंबर इत्यादी.
शेत जमीन मोजणीसाठी योग्य ते पर्याय निवडा:
* त्यांनतर सर्वे आणि सीटी सर्वे असे दोन पर्याय या ठिकणी तुम्हाला दिसतील त्यापैकी सर्व्हे हा पर्याय निवडा.
* purpose of measurements मोजणीचा उद्देश या पर्यायवर क्लिक करताच या ठिकाणी boundary confirmation, court commission, court watap, Gunthewari, Land grant, non agriculture, pot hissa other असे पर्पयाय दिसतील.
* पहिला जो पर्याय आहे boundary confirmation म्हणजेच हद्द कायम या पर्यायावर क्लिक करा.
* जिल्हा तालुका आणि तुमचे गाव निवडा तुमच्या शेताचा गट नंबर टाका त्यानंतर लगतच्या शेतकऱ्यांची नावे व पत्ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे.
मोजणी नकाशाची प्रत तुम्हाला कशी हवी आहे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष भेटून:
* Is measurement fees deposited in government treasury? म्हणजेच मोजणी फी शासकीय कोषागारमध्ये जमा केली आहे का?
* असेल तर yes या बटनावर क्लिक करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा.
* मोजणी नकाशाची प्रत तुम्हाला कशी हवी आहे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष भेटून postage व personal visit या दोन पर्यायापैकी एका बटनावर क्लिक करा.
* शेवटी सबमिट या पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
* सबमिट करताच आपला अर्ज जतन करण्यात आला आहे असा संदेश तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला mahawallet token id दिसेल तो जतन करून ठेवा.
फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा:
अर्जदारास त्याचा फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. फोटो अपलोड करताना त्याची साईझ ५ केबी ते २० केबी दरम्यान असावी त्याच प्रमाणे फोटो २०० पिक्सेल उभा व १६० पिक्सेल अडवा असावा. सहीची साईझ सुद्धा २५६ पिक्सेल अडवी व ६४ पिक्सेल उभा असावा. अर्जदाराचा फोटो आणि सहीचा नमुना व्यवस्थितपणे अपलोड केल्यानंतर काही कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहेत.
शेतीची इतर कागदपत्रे अपलोड करा:
जसे कि ज्या शेताची मोजणी करायची आहे त्या शेताच्या सातबाराऱ्यावर असलेल्या इतर शेतकऱ्यांची सहमती म्हणजेच co holders as per 7 12 extract and their consent. त्यानंतर तलाठी यांच्या सही शिक्क्याचा ३ महिन्याच्या आतील सातबारा उतारा म्हणजेच certified latest 7 12 extract within 3 month आणि property card हि कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करणे अनिवार्य आहेत. बाकीचे कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असतील तर ती अपलोड करा किंवा नसतील तो सोडून द्या. सबमिट या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक करताच या ठिकाणी आपली कागदपत्रे यशस्वीरीत्या अपलोड झालेली आहेत कृपया आपण पेमेंट करावे असा संदेश या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजेच या पुढची प्रक्रिया जी असेल ती पेमेंट ची असेल. चला तर जाणून घेवूयात कि पेमेंट कसे करावे. OK या बटनावर क्लिक करा.
शेत जमीन मोजणी अर्ज फी किंवा पेमेंट प्रक्रिया:
Make Payment असे एक पेज याठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी शेत मोजणी साठी जे पेमेंट तुम्हाला करायचे आहे त्याचे तपशील येतील ते वाचून घ्या. हिरव्या रंगाच्या कन्फर्म या बटनावर क्लिक करा. ज्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू इच्छिता तो पर्याय या ठिकाणी निवडा, उदाहरणार्थ या ठिकाणी इंटरनेत बँकिंग हा पर्याय निवडल्यानंतर तुमचे खाते ज्या बँकेत असेल ती बँक निवडा आणि make payment या बाटणार क्लिक करा.
पेमेंट यशस्वितेसाठी इंटरनेटची सुविधा चांगली असल्याची खात्री करा:
तुमच्या बँकेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉगीन करा पेमेंट संबधी सूचना येईल ती वाचून घ्या. कन्फर्म या बटनावर क्लिक करा, जसे हि तुम्ही कन्फर्म या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या बँकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक हायर सिक्युरिटी कोड येईल तो या चौकटीत टाका आणि कन्फर्म या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर Your payment was successful असा संदेश तुम्हाला दिसेल. या ठिकाणी कोणतीही activity करू नका, हे पेज आपोआप रीडायरेक्ट होईल Thanks your transaction is successful असा संदेश या ठिकाणी आलेला आहे. याचा अर्थ आता पेमेंट पूर्णपणे यशस्वी झालेले आहे.
पेमेंटच्या पावतीची प्रिंट काढा किंवा डाउनलोड करा:
शेतमोजणीसाठी तुम्ही जे पेमेंट केले आहे त्यांची पावती तुम्हाला हवी असेल तर प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि हि पावती प्रिंट करून घ्या. तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेले नसेल तर pdf स्वरुपात डाउनलोड करून घ्या. आता होम या बटनावर क्लिक करा या ठिकाणी तुम्ही जेवढेहि अर्ज केले असेल त्या अर्जांची सद्यस्थिती दिसेल. आता हा अर्ज आपण नुकताच सादर केला आहे त्या संबधात सर्व तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसतील view या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज बघू शकता. डाउनलोड या बटनावर क्लिक करून पेमेंटची पोच पावती डाउनलोड करू शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to apply for Farm land area counting online on Aaple Sarkar portal in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO