4 January 2025 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

शहर ते गावाकडल्या तरुणांना खुशखबर | पासपोर्ट काढा पोस्ट ऑफिसमधून | कसा कराल अर्ज? - नक्की वाचा

How to apply for passport through Indian Post Office

मुंबई, २६ जुलै | शहरातील नव्हे तर गावाकडील शिकलेल्या तरुणांसाठी देखील अंत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण, पासपोर्ट काढण्यासाठी लाख खटपटी कराव्या लागत होत्या आणि पासपोर्ट ऑफिसला जावं लागत होतं. गावखेड्यात तर ते अधिकच कठीण काम म्हणावं लागेल. पण आता ही सगळी कटकट दूर होणार आहे. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता पासपोर्ट मिळवता येणार आहे.

इंडिया पोस्टनेच एका अधिकृत ट्विटद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आता आपण जवळच्या पोस्ट ऑफिस सीएससी काउंटरवर पासपोर्टसाठी नोंदणी आणि अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या. ”

Passindindia.gov.in नुसार “पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे ह्या पासपोर्ट कार्यालयांच्या विस्तारित शाखा आहेत आणि पासपोर्ट देण्याशी संबंधित फ्रंट-एंड सेवा प्रदान करतात. या केंद्रांमध्ये टोकन जारी करण्यापासून ते पासपोर्ट देण्यासाठी अर्ज करण्यापर्यंतची प्रक्रिया समाविष्ट आहे.

कसा कराल अर्ज?
पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी आपण नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला पासपोर्ट तयार करण्यासाठीचं ऑनलाईन शुल्क आणि फॉर्म जमा करावा लागतो. असे केल्यावर तुम्हाला एक तारीख सांगितली जाईल. त्या दिवशी आपल्याला निवडलेल्या कागदपत्रांसह जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल.

कोणती कागदपत्रं लागतील?
पासपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला, दहावी-बारावीचं मार्कशीट, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड आणि नोटरीद्वारे केलेले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे लागतील. हे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल.

पडताळणी रेटिना स्कॅनिंगद्वारे केली जाणार:
आपली सर्व कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये नेल्यानंतर त्याची सत्यता तपासली जाईल. कागदपत्रे योग्य आढळल्यास प्रक्रिया पुढे जाईल. या भेटीदरम्यान अर्जदाराचे फिंगर प्रिंट आणि डोळ्यातील पडदा स्कॅन केला जाईल. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेस 15 दिवस लागतील. यानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for passport through Indian Post Office in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x