25 December 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024
x

शेतकऱ्यांनो | PMFME योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करा | वाचा संपूर्ण माहिती

How to apply for PMFME Scheme online

मुंबई, ०२ ऑगस्ट | कृषी विभाग योजना 2021 अंतर्गत PMFME Scheme अर्थात सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या PMFME scheme अर्थात प्रधानमंत्री सुक्ष अन्न प्रक्रिया उद्योग संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. PMFME scheme हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे.

PMFME scheme योजना अंतर्गत मिळणार १० लाखापर्यंत अनुदान:
जिल्ह्यामध्ये ज्या पिकाचे जास्त उत्पादन शेतकरी घेतात त्या उत्पादन संबधित उद्योग उभारणीसाठी लाभार्थ्यांना जास्तीत जास्त १० लाख किंवा एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा किंवा टच करा.

PMFME registration (नोंदणी) प्रक्रिया जाणून घ्या:
ज्या लाभार्थ्यांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा म्हणजेच PMFME scheme लाभ घ्यावयाचा आहे त्यांना अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. अर्ज करणारे शेतकरी बांधव असतील आणि हा अर्ज सादर करतांना काही अडचण येत असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण जिल्हा पातळीवर हे सहाय्य करण्यासाठी एक किंवा अनेक व्यक्ती असतात त्यामुळे अर्ज व्यवस्थित सादर करण्यासाठी तुम्हाला मदत होते.

ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करा – Click on Link Here Or Copy Link: https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Login

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे विविध शासन निर्णय बघा PMFME Scheme GR:
पी एम एफ एम ई योजनेचा शासन निर्णय बघण्यासाठी खाली काही लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेचे शासन निर्णय बघू शकता. योजना कशी राबविली जाणार आहे, योजनेसाठी कोणकोणत्या व्यक्ती पात्र आहेत त्याचप्रमाणे कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

क्लिक करा GR बघा : Click Here to View OR Copy Link To View: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/pm-fme-scheme-GR-1.pdf

पीएमएफएमई योजना संदर्भातील माहिती:
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना उद्योग व्यवसाय करण्यास शासनाची आर्थिक सहाय्यता मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for PMFME Scheme online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x