10 January 2025 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

संजय गांधी निराधार योजना विशेष सहाय्य योजनेचा फायदा कसा घ्याल? - वाचा आणि शेअर करा

Apply for Sanjay Gandhi Niradhar Yojana

मुंबई, ०६ जुलै | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर सर्व योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. यामध्ये हे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गंभीर आजाराने ग्रासलेली व्यक्ती, विधवा महिला आणि अपंग मुले व मुली यांना या योजनेचा लाभ मिळू शकते. यासाठी ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध व्यक्तीसाठी श्रावण बाळ निवृत्ती या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते.

सदर योजनेचा लाभ देण्यासाठी अपंग वगळता सर्वांना 21 हजारांच्या आतील उत्पन्न दाखला असणे बंधनकारक आहे. किंवा दारिद्रय रेषेचा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. मात्र अपंगांसाठी 50 हजार इतका उत्पन्न वाढवून देण्यात आलेला आहे. सदर योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करावा त्यासाठी कुठली कुठली प्रक्रिया करावे लागतात कोणत्या कोणत्या कार्यालयात जावे लागते हे सर्व माहिती खाली पाहणार आहोत. विशेष सहाय्य योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेसाठी अर्ज केल्यापासून मंजुरीस लागणारी कालावधी तीस दिवस आहे.

सदर योजनेसाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडून मंजुरी मिळते:
या योजनेमध्ये हे सर्व कागदपत्रे बरोबर असून देखील योजना मंजूर होण्यास विलंब झाल्यास किंवा नामंजूर किंवा रद्द झाल्यास आपण संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करू शकतो. जर माननीय उपविभागीय अधिकारी यांनीदेखील सर्व कागदपत्रे बरोबर असताना अर्ज नाकारल्यास किंवा रद्द केल्यास किंवा विलंब झाल्यास आपण माननीय विभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करू शकतो.

विशेष सहाय्य योजने साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

ओळखीच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रे जोडावी:
1) पॅन कार्ड
2) आधार कार्ड
3) मतदान ओळखपत्र
4) वाहन चालक अनुज्ञप्ती
5) जॉब कार्ड. या पैकी एक कागदपत्र जोडावे.

पत्त्याच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रे जोडावी:
ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी दिलेला रहिवाशी दाखला 2) रेशन कार्ड 3) आधार कार्ड 4) वाहन चालक अनुज्ञप्ती 5) मतदान ओळखपत्र
या पैकी एक कागदपत्र जोडावे.

वयाच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रे जोडावी:
1) शाळा सोडल्याचा दाखला
2) पॅन कार्ड
3) ग्रामीण रुग्णालय नागरी रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला वयाचा दाखला किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला वयाचा दाखला.
4) ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या जन्म नोंद वहीतील उताराची प्रत या पैकी एक कागदपत्र जोडावे.

उत्पन्नाच्या पुराव्यासाठी खालील कागदपत्रे जोडावी:
तहसीलदार यांच्याकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला.
किंवा दारिद्र रेषेखाली असलेला दाखला. या पैकी एक कागदपत्र जोडावे.

इतर महत्त्वाची कागदपत्रे:
* शिक्षा झालेली असल्यास माननीय न्यायालयाच्या आदेशाची प्रत
* विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला.
* घटस्फोटीत महिला असल्यास माननीय न्यायालय यांच्याकडून पोटगी मिळत नसल्याबाबत चा आदेशाचा प्रत
* गंभीर आजार असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून दिलेला दाखला.
* ग्रामीण भागासाठी तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका महानगरपालिकेचे कर निरीक्षक यांचा प्रमाणपत्र.
* या योजनेत नमूद केलेल्या उत्पन्नाच्या पेक्षा कमी मिळत असल्यास त्याबाबतचा माननीय न्यायालय यांचा आदेश व पुरावे जोडावे.
* अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगतवा बाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेला प्रमाणपत्र
* अनाथ असल्यास त्याबाबतचा दाखला जोडावे.
* शारीरिक छळ झाले असल्यास किंवा बलात्कार झाले असल्यास त्याबाबतचा जिल्हा शल्य चिकित्सक आणि महिला व बाल विकास
* अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे तसेच बलात्कार संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याचा प्रमाणपत्रही जोडावा.
* ज्या स्त्रीने कायदेशीररीत्या घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केले आहे परंतु घटस्फोट मिळण्यासाठी अंतिम कारवाही झाली नाही कालावधीमध्ये पती आणि पत्नी वेगळे राहत असल्यास संबंधित गावातील तलाठी आणि ग्रामसेवक यांचे संयुक्तरीत्या दिलेले प्रमाणपत्र जोडावे. शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका महानगरपालिकेचे निरीक्षक यांचे प्रमाणपत्र जोडावे.

1. विशेष सहाय्य योजने अंतर्गत येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे:
प्रथमतः ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून वयाचा दाखला घ्यावा. त्यानंतर माननीय तहसीलदार यांच्याकडून 21 हजाराचा उत्पन्न दाखला काढून घ्यावा. त्यानंतर वर दिलेल्या यादी मधील संबंधित सर्व कागदपत्रे जुळवाजुळव करावी. यामध्ये वयाचा दाखला, पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि इतर कागदपत्रे घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा तहसीलदार कार्यालय असलेला सेतु केंद्र इथे अर्ज करण्यासाठी जावे. किंवा आपले सरकार या पोर्टलवर नागरीकांचा लोगिन हा पर्याय निवडून आपली नोंदणी करून घ्यावी लॉगिन करून घेतल्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा विभाग निवडून त्यामध्ये येणारा विशेष सहाय्य योजना ह्या वरती क्लिक करून आपली पूर्ण फॉर्म भरून घ्यावे. पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडावीत त्यानंतर शुल्क भरावे.

2. अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असणार आहे:
संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना किंवा इतर योजनेसाठी अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती सांभाळून ठेवावी आपण नोंदणी करताना किंवा फॉर्म भरताना जे मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबर वर आपल्या अर्जावर होणारे प्रक्रियाचे किंवा मंजूर नामंजूर याची सूचना मिळत राहतील. एखाद्यावेळी आपल्या अर्जाला काही कारणामुळे त्रुटी लागल्यास आपले सरकार केंद्र सेतू केंद्र येथून अर्ज केले असल्यास लगेच जाऊन त्रुटी समजून घ्यावे आणि तिची पूर्तता करून अर्ज पुन्हा सादर करावी.

3. मंजुरी केव्हा व कशी मिळते:
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना आणि इतर योजनेसाठी जेव्हा आपण अर्ज करतो. त्यानंतर ते अर्ज तहसीलदार कार्यालयातील यांच्या टेबलला जाते तपासून नायब तहसीलदार यांच्या टेबलला पाठवतात नायब तहसीलदार याने सर्व काही बरोबर असल्यास अर्ज तपासून मान्य तहसीलदार यांच्या टेबलला पाठवतात. त्यानंतर माननीय तहसील यांनी अर्ज पूर्णपणे तपासून असल्यास मंजुरी देतात अन्यथा त्रुटी लावतात किंवा नामंजूर करतात.

4. योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळतो?
सदर योजनेचा मंजुरी मिळाल्यानंतर आपण ज्यावेळी फॉर्म भरताना बँक खाते क्रमांक दिलेला असेल त्या खात्यामध्ये आपला लाभ जमा होतो.

अधिक माहितीकरिता शासणाच्या या वेबसाईट ला भेट द्या. https://sjsa.maharashtra.gov.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x