22 January 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? | जाणून घ्या सविस्तर

Shop act license online

मुंबई, १९ जुलै | नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो. व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते. त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते. शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.

शॉप अधिनियम / व्यवसाय दाखला प्राप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
* जेथे व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे त्या शॉपचे नावासहीत फोटो
* मालकाचे फोटो
* व्‍यवसायाच्‍या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिल भाडेपावती अथवा खरेदीखत
* जागा स्वमालकीची नसेल तर मालकांचे संमतीपत्र.
* नुतनीकरण असल्‍यास ओरिजनल शॉपअॅक्‍ट लायसन्‍स
* आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स.
* त्‍यास लागणारी व्‍यवसाय स्‍वरुपानुसार योग्‍य ती फी जमा व्‍यवसायाचे लायसन अथवा नुतनीकरण करून मिळते.

* तर आज आपण घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स कसे काढायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल वर जाऊन टाईप करायचे आहे ‘आपले सरकार’ ( https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en ) त्यानंतर तिथे दिलेल्या न्युज यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल.

* नंतर तुमचे रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो आणि तुमचा जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे, तसेच खाली दिलेला कॅपचा लेटर टाकून तुम्हाला लॉगिन करायचे आहे. असे केल्यानंतर तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल ,त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे,

* जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर तिथे दिलेल्या इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषा निवडा ,तसेच डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, इथे तुम्हाला सर्च हा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला shop and establishment हा पर्याय निवडायचा आहे.

* असे केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल तिथे indivitual आणि organization यापैकी indivitual हा पर्याय निवडायचा आहे आणि submit या बटणावर क्लीक करायचे आहे त्यानंतर ओपन होणाऱ्या डाव्या बाजूला दिलेल्या पर्यायांपैकी shop अँड establishment application या पर्यायावर क्लिक करायचे आहे,

* येथे तुमच्यापुढे दोन फॉर्म चे पर्याय दिसेल एक असेल तो म्हणजे शून्य ते नऊ कामगार असेल तर आणि दुसरा म्हणजे दहापेक्षा जास्त कामगार असले तर समजा मी शून्य ते नऊ वर्ग असा पर्याय निवडला त्यानंतर खाली confirm या बटणावर क्लिक करायचे आहे असे केल्यावर तुमच्यापुढे form F उघडेल.

* या फॉर्ममध्ये सर्वप्रथम विभाग निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा आणि त्यासाठी उपलब्ध असलेले जवळील ऑफिस त्याचे नाव निवडायचे आहे ,खाली दिलेल्या आस्थापनेचे नाव या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या दुकानाचे नाव टाकायचे आहे जे की तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर त्याच्या बाजूला ते मराठीमध्ये आपोआप लिहून येईल.

* त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांमध्ये आस्थापने पूर्वीची सविस्तर माहिती या ठिकाणी new registration हा पर्याय निवडायचा आहे व खाली दिलेल्या आस्थापनेचे पत्ता व विभाग या खाली तुम्हाला तुमच्या दुकानाचा पत्ता व्यवस्थितपणे टाकायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर खाली व्यवसाय सुरू करण्याचा दिनांक हा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला व्यवसाय चालू करण्याचा दिनांक टाकायचा आहे.

* व त्याखाली व्यवसायाचे स्वरूप टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय प्रायव्हेट आहे कि पब्लिक सेक्टरमध्ये आहे यापैकी एक पर्याय निवडायचा आहे .खाली दिलेल्या मनुष्यबळ/ कामगार तपशील या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे किती कामगार आहेत त्यापैकी स्त्रिया किती आहेत पुरुष किती आहेत आणि इतर किती आहेत हे टाकायचे आहे.

* त्याच प्रमाणे खाली मालकाचे पूर्ण नाव जेकी आधार कार्ड वर दिलेले असेल त्याप्रमाणे टाकायचे आहे आणि त्याखाली मालकाचा रहिवासी पत्ता टाकायचा आहे.त्यानंतर खाली व्यवसायाचे वर्ग कोणता आहे जसे की दुकाने/सायबर कॅफे/थेटर यापैकी जे असेल ते निवडायचे आहे.

* नंतर आस्थापनेचा प्रकार टाकायचा आहे जसे की मालक/भागीदारी/कंपनी इत्यादी.तसेच खाली दिलेल्या रकान्यात तुम्हाला तुमच्या कामगारांची नावे, पुरुष किती ,स्त्रिया किती आणि इतर किती हे टाकायचे आहे.अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यावर खाली दिलेल्या self decleration वाचून घ्यायचं आहे.आणि I agree या पुढील बॉक्स मध्ये क्लिक करायचे आहे.

* व submit या बटन वर क्लिक करायचे आहे.असे केल्यावर तुमच्या पुढे स्क्रीन वर एक मेसेज येईल.ज्यावर एक application id दिलेला असेल त्यावर ok या बटन वर क्लिक करायचं आहे. पुढे आपल्याला upload documents या पर्याय दिसेल तिथे क्लिक केल्यावर कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि त्याची साईज काय असावी हे दिले आहे.

* त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे कागदपत्रे तिथे अपलोड करायची आहेत.डाव्या बाजूला दिलेल्या self declaration या पर्यायावर क्लिक करून जो फॉर्म येईल तो प्रिंट करून घ्यायचा आहे आणि त्यावर खाली मालकाचे नाव आणि सही करून पुन्हा तो फॉर्म pdf मध्ये बनवून अपलोड करायचा आहे.

* त्याचप्रमाणे आधार कार्ड, दुकानाचा मराठी पाटी असलेला फोटो, तुमचा पासपोर्ट फोटो, सही हे सगळे अपलोड केल्यावर ,जर तुमचा सायबर कॅफे असेल तर noc द्यावी लागेल आणि other या पर्यायाला टिक करून पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स हे देखील अपलोड करायचे आहे.

* सर्व केल्यावर upload या बटन वर क्लिक करायचे आहे.हे झाल्यावर तुमच्या पुढे पेमेंट भरण्यासाठी पेज येईल.यामध्ये ऑनलाइन आणि चलन भरून असे दोन पर्याय येतील. त्यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता. समजा आपण online पर्याय निवडला ,यानंतर खाली confirm या बटन वर क्लिक करायचे आहे.

* असे केल्यावर maha online चा पेमेंट गेटवे ओपन होईल. जिथे तुम्ही वॉलेट /डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग या पैकी काहीही वापरून पैसे भरू शकता.पैसे भरल्यावर यशस्वी रित्या पेमेंट भरल्याचा मेसेज दिसेल.फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या back या बटन वर क्लिक करायचे आहे.यानंतर तिथे उजव्या बाजूला download form करुन तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो प्रिंट करू शकता. तसेच खाली download intimation receipt वर क्लिक करून तो आपल्याला पाहता येईल. जे की तुमचे शॉप ऍक्ट लायसेन्स आहे.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Shop act license online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x