22 November 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

विहीर अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज | आणि मिळवा योजनेचा आर्थिक लाभ - नक्की वाचा

Apply for Vihir Anudan Yojana 2021

मुंबई , १० जुलै | शेतकरी बंधुंनो विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज कसा करावा, कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हि सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

विहीर अनुदान योजना संदर्भात माहिती जाणून घेण्याअगोदर खालील माहिती वाचा:
शेतकरी बंधुंनो शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले कि मग जमीन खडकाळ जरी असली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढता येते. शेतीला पाणी देण्यासाठी अनेक प्रकारचे स्त्रोत शेतकरी वापरतात जसे कि विहीर, बोअर, शेततळे किंवा मग पाटाच्या पाण्यावर देखील शेती करता येते. या सर्व पर्यायांपैकी विहीर हे मध्यम शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

नवीन विहिरीसाठी 2.50 लाख रुपये अनुदान मिळणार:
विहीर खोदकाम करण्यासाठी अजूनही अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतात विहीर खोडलेली नाही. प्रत्येक शेतकरी बांधवांना वाटते कि आपणही आपल्या शेतात विहीर खोदावी चांगले उत्पन्न घ्यावे आणि जीवनमान उंचावे. शेतकरी बंधुंनो शेतामध्ये विहीर खोदण्याचे तुमचे हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. महा डीबीटी पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत नवीन विहिरीसाठी (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार) इतके अनुदान मिळणार आहे.

योजनेसाठी पात्रता काय आहे ते जाणून घेवूयात:
* लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
* लाभार्थ्याने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
* लाभार्थ्याच्या जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक राहील..
* वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लक्ष रुपयाच्या मर्यादेत असावी.
* लाभार्थीला उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
* 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत लाभार्थीची जमिनधारणा (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर मर्यादा आहे) असणे बंधनकारक आहे.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
* अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
* जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा.
* रु. 1,50,000/- पर्यंतचे तहसीलदार यांचेकडील वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
* 100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
* लाभार्थी जर अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र.
* तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत) विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर * असलेचा दाखला, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं., नकाशा व चतु:सीमा.
* पाणी उपलब्धतेचा दाखला.
* कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र.
* गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
* विहिरीच्या जागेचा फोटो
* ग्रामसभेचा ठराव.

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:
* सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
* लाभार्थ्याला रु. 1,50,000/- पर्यंतचे तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
* जमिनीचा 7/12 दाखला व 8 अ उतारा.
* ग्रामसभेचा ठराव.
* तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
* 100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीचे बंधपत्र.
* क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
* गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
* ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्या विहिरीचे कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
* इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
* अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र

विहीर अनुदान योजना संबधित अर्ज प्रक्रिया सुरु:
मित्रांनो या व्हिडीओमध्ये इनवेल बोरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, नवीन विहिरीचे बांधकाम या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. नवीन विहिरीसाठी याच पद्धतीने या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. सध्या या पोर्टलवर नवीन विहीर अर्ज सुरु नाहीत परंतु जर अर्ज सुरु झालेत तर अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे त्यामुळे या व्हिडीओमध्ये जरी इनवेल बोरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, नवीन विहिरीचे बांधकाम या संदर्भात माहिती दिली असली तरी अशाच पद्धतीने तुम्हाला नवीन विहिरीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

असा करा विहीर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज:
* सगळ्यात अगोदर तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप करा mahadbt farmer login
* जसे हि तुम्ही हा कीवर्ड टाईप कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपले सरकार महाडीबीटी हि वेबसाईट ओपन होईल.
* युजरनेम व पासवर्ड टाकून लॉग इन करा. जर तुम्हाल महित नसेल कि महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करा.
* यशस्वीपणे लॉगीन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक Dashboard दिसेल. या ठिकाणी अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.
* या ठिकाणी विविध योजनाचे पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायसमोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
* जसे हि तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक सूचना तुम्हाला दिसेल अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या पैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा. हि सूचना वाचून झाल्यावर ओके या बटनावर क्लिक करा.
* अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असा एक form तुमच्या स्क्रीनवर दिसेल याठिकाणी खालील माहिती भरावी लागेल.

विहीर अनुदान योजना इनवेल बोअरसाठी ऑनलाईन अर्ज:
* शेतकऱ्यांचा तालुका निवडा.
* गाव किंवा शहर.
* सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक.
* मुख्यघटक या रकान्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना हा पर्याय निवडा.
* घटक निवडा या चौकटीवर क्लिक करा. या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी इनवेल बोअर या पर्यायावर क्लिक करा.
* या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिसत असलेल्या अटी व शर्थी या बटनासमोरील दिसत असलेल्या चौकटीमध्ये क्लिक टिक करा.
* हि माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
* जसेही तुम्ही जतन करा या बटनावर क्लिक कराल, त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर आपणास या घटका अंतर्गत उपलब्ध असलेल्या अन्य बाबींचा लाभ घ्यावयाचा आहे का म्हणजेच इतर आणखी योजनेसाठी अर्ज करायचा आहे का अशी एक सूचना दिसेल. आणखी योजनासासाठी अर्ज करायचा असेल तर Yes या बटनावर क्लिक करा. नसेल तर No या बटनावर क्लिक करा. या ठिकणी आपल्याला आणखी योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी Yes या बटनावर क्लिक करणार आहोत.

जुनी विहीर दुरुस्ती ऑनलाईन अर्ज:
* या अगोदर ज्या प्रमाणे इनवेल बोअरसाठी अर्ज केला त्याचप्रमाणे जुनी विहीर दुरुस्तीसाठी सुद्धा अर्ज करायचा आहे.
* दिलेल्या रकान्यामध्ये शेतकऱ्याचा तालुका गाव किंवा शहर सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक या संदर्भातील माहिती टाका.
* त्यानंतर मुख्यघटक या चौकटीमध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायाला सिलेक्ट करा.
* घटक निवडा या चौकटीवर क्लिक करताच या ठिकाणी अनेक योजना तुम्हाला दिसतील त्यापैकी जुनी विहीर दुरुस्ती या पर्यायावर क्लिक करा.
* त्यानंतर वरील प्रमाणे नियम व अटी या पर्यायासमोरील चौकटीत टिक करा.
* जतन करा या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
* परत पहिल्यासारखीच सूचना दिसेल. आणखी योजनासाठी अर्ज करायचा असेल तर Yes या बटनावर क्लिक करा.

नवीन विहिरीचे बांधकाम ऑनलाईन अर्ज:
* ज्या प्रकारे इनवेल बोअरसाठी ऑनलाईन अर्ज व जुनी विहीर दुरुस्ती ऑनलाईन अर्ज आपण केला आहे त्याच पद्धतीने नवीन विहीर बांधकाम या योजनेसाठी अर्ज करता येईल. शेतकऱ्याचा तालुका गाव जमिनीचा सर्वेक्षण या संदर्भातील माहिती व्यवस्थित टाका.
* मुख्य घटक या योजनेमध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना निवडा.
* घटक निवडा या चौकटीवर क्लिक करून नवीन विहिरीचे बांधकाम असा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. नवीन विहीर बांधकाम या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दिलेल्या चौकटीत टिक करून अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.

विहीर अनुदान योजनेचा अर्ज यशस्वीपणे सादर केल्यानंतर पुढील क्रिया.
अशा प्रकारे या ठिकाणी आपण इनवेल बोअर, जुनी विहीर दुरुस्ती व नवीन विहीर बांधकाम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे. माहिती अजून संपलेली नाही आहे. पुन्हा एकदा या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर या.

अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा:
* जसे हि तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक सूचना तुम्हाला दिसेल. कृपया खात्री करा की आपण आपल्या पसंतीच्या सर्व मुख्य घटकांमधून सर्व घटक निवडले आहेत. एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर, आपण त्या अर्जात इतर घटक जोडू शकत नाही. आपण या अर्जात अधिक घटक जोडू इच्छित असल्यास कृपया ‘मेनू वर जा’ ​​बटणावर क्लिक करा किंवा ‘अर्ज सादर करा’ बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.
* ओके या बटनावर क्लिक करून हि पॉप अप विंडो बंद करा.
* पहा या बटनावर क्लिक करा.
* योजनेला प्राधान्य क्रमांक द्या.
* अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

विहीर अनुदान योजनेसाठी पेमेंट करण्याची पद्धत:
जसे हि तुम्ही अर्ज सादर कराल त्यावेळी तुम्हाला काही पेमेंट या ठिकाणी करायचे आहे त्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी योग्य तो पर्याय वापरून पेमेंट करण्याची पद्धत निवडा आणि पेमेंट करा. यशस्वी पेमेंट केल्यानंतर तुमच्या पेमेंट केल्याची पावती मिळेल टी प्रिंट करून घ्या. तुमच्या कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर हि पावती pdf मध्ये डाउनलोड करून घ्या. तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे अर्जाची पोहोच पावती डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटच्या मुखपृष्ठावर या स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसत असलेल्या मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.

विहीर अनुदान योजनेची पावती डाउनलोड करून घ्या:
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचा अर्ज छाननी अंतर्गत अर्ज या सदरामध्ये येईल. या ठिकाणी डाउनलोड पोहोच पावती असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. जसे हि तुम्ही डाउनलोड पोहोच पावती या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हि पोहोच पावती डाउनलोड होईल या पोहोच पावतीचे तुम्ही एकतर प्रिंट काढू शकता किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for Vihir Anudan Yojana 2021 online in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x