23 February 2025 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

जात वैधता प्रमाणपत्रासाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा? | वाचा ऑनलाईन प्रक्रिया

How to apply online for Caste validity certificate

मुंबई, ०७ जुलै | अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे. त्या अनुरोधाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून, त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
* जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php हि वेबसाईट ओपन करायची आहे.
* आता नवीन युजर (New User Registration) वर क्लिक करा.

आता माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन करा:
१. मोबाईल नंबर टाकल्यावर OTP येईल तो तिथे टाका आणि एक मेल आयडी’वर मेल येईल.
२. त्यानंतर युजर नेम म्हणजेच मेल आयडी आणि पासवर्ड मोबाईल नंबर वर मॅसेज येईल तो घेऊन लॉगिन करा.
३. आता Terms and Conditions चे पेज येईल ते वाचून I agree वर क्लिक करून Proceed वर क्लिक करा.

अर्जाचा प्रकार:(Type of Application):
* शिक्षण (Education)
* निवडणूक(Election)
* सेवा( Service)
* इतर( Other)

अर्जाचा प्रकार सिलेक्ट करून सबमिट बटन वर क्लिक करा.
नंतर Applicant Information विंडो ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराची माहिती भरा.

सक्षम प्राधिकरणाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कागदपत्राचे नाव:
* अर्जदार शाळा एलसी / टीसी
* फादर स्कूल एलसी / टीसी
* ग्रँड फादर स्कूल एलसी / टीसी
* जुने 7/12
* 8 अ
* स्वत: ची घोषणा
* प्रतिज्ञापत्र
* वडिलांचे जात प्रमाणपत्र
* आजोबांचे जातीचे प्रमाणपत्र
* बोनाफाईड प्रमाणपत्र
* रेशन कार्ड
* रक्ताच्या नात्यात जातीचे वैधता प्रमाणपत्र
* कोतवाल पुस्तकाची प्रत
* सेवा पुस्तकाची प्रत
* अर्जदाराचा फोटो आयडी

अर्जदाराची सर्व माहिती भरून पत्ता, कुटूंबाची माहिती, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Updates: How to apply online for Caste validity certificate in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x