तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय की नाही? | मोबाईलवर सहजपणे असं चेक करा | पहा स्टेप्स
मुंबई, १२ ऑगस्ट | देशभरात अनेक लोकांना आपल्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत आहे की नाही? हे माहित नसते. यावितिरिक्त किती रुपये गॅस सबसिडी म्हणून मिळते याचीदेखील माहिती नसते. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर काळजी करु नका. आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे की नाही? याची माहिती देणार आहोत. या टिप्सव्दारे तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता.
इंडेनच्या ग्राहकांनी अशाप्रकारे चेक करावे खाते?
* सर्वात आधी मोबाईल क्रोममध्ये गेल्यावर www.mylpg.in हे टाइप करावे लागेल.
* यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल. तुमचा जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्याच्या फोटोवर टॅप करा.
* आता उघडलेल्या विंडोमध्ये ‘Give your feedback online‘ वर क्लिक करा.
* यानंतर पुढील पान उघडेल जिथे तुम्हाला सिलेंडरच्या चिन्हावर क्लिक करावे लागेल.
* यानंतर पुढील पृष्ठावर ‘Subsidy Related (PAHAL) वर क्लिक केल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला 3 पर्याय मिळतील.
* यामध्ये ‘Subsidy not received‘ वर क्लिक केल्यावर पुढील पृष्ठ उघडेल जिथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा एलपीजी आयडी भरावा लागेल आणि सबमिट करावे लागेल.
* आता तुम्ही शेवटच्या 5 सिलिंडरसाठी किती पैसे दिले आणि किती पैसे मिळाले, हे समोर येईल.
* जर तुम्हाला सबसिडी मिळाली नसेल तर तुम्ही खाली ‘सिलेक्ट’ पर्यायावर क्लिक करून तुमची तक्रार नोंदवू शकता.
HP आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी असे चेक करावे?
* सर्वात आधी www.mylpg.in या संकेतस्थळावर जा.
* यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल. तुमचा जो कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्याच्या फोटोवर टॅप करा.
* यानंतर आलेल्या पुढील पेजवर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल. जर तुम्ही पहिल्यांदा वेबसाईटवर आले असाल तर तुम्हाला ‘new user’ वर क्लिक करावे लागेल.
* येथे आपल्याला कस्टमर नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून ‘continue’ वर क्लिक करा.
* यानंतर आपल्याला युझर आयडी आणि पासवर्ड जनरेट करावे लागेल.
* युझर आयडी आणि पासवर्ड जनरेट केल्यानंतर तुम्हाला ‘Sign in’ करावे लागेल.
* त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्डसह कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘Login’ वर क्लिक करा.
* आता डाव्या बाजूला तुम्हाला ‘view cylinder booking history’ वर क्लिक करावे लागेल.
* यानंतर, तुम्ही सिलिंडरसाठी किती पैसे दिले आणि किती पैसे मिळवले हे समोर येईल.
* जर तुम्हाला अनुदान मिळाले नसेल तर तुम्ही complaint/feedback क्लिक करून तुमची तक्रार नोंदवू शकता.
का थांबते सबसिडी?
जर तुम्हाला एलपीजीवर सबसिडी मिळत नसेल तर तुमचे आधार कार्ड लिंक नाही. एलपीजीचे अनुदान राज्यांमध्ये वेगळे आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना कुठलेही अनुदान दिले जात नाही. कारण 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांच्या उत्पन्नासह एकत्र केले जाते. त्यामुळे यांना त्यांचा लाभ घेता येत नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to check Gas cylinder subsidy status online in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH