9 January 2025 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

शेतकरी बांधवांनो पीक विम्याची तक्रार कोठे करायची माहित आहे? जाणून घ्या प्रक्रिया

How to do complaint about crop insurance

मुंबई, ०९ जुलै | पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात 2016च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे. मात्र, आधी ती कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक होती. आता गेल्यावर्षीपासून सरकारने कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच ते सहभाग नोंदवू शकतात. पण, पीक विमा काढल्यानंतर तो मंजूर झाला की हे कुठे बघायचं? तसेच पीकविम्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या नेमक्या कुठं नोंदवायच्या?

पीक विमा मंजूर झाला की नाही कसं तपासायचं?
* शेतकऱ्यांनो तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की नाही ते आपल्याच मोबाईलवर पाहू शकता.
* सर्वप्रथम पंतप्रधान पीक विमा योजनेच्या PMFBY च्या ऑफिशिअल वेबसाइटवर जावे. त्यानंतर Application Status या पर्यायावर क्लिक करा.
* तुम्हाला पीक विमा काढताना पावती मिळाली असेल तर त्या पावतीवरील क्रमांक टाका. त्यानंतर कॅप्चा टाका. त्यानंतर Check Status वर क्लिक करा.
* तुमचा विमा मंजूर झाला असेल तर अप्रूव्ह असे लिहून येईल.

पंतप्रधान पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळते का, असा सहज प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. मात्र, या आपल्या शंका किंवा तक्रारींना योग्य उत्तरे विमा कंपन्या किंवा बॅंकांकडून मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत.

विम्यासंबंधी तक्रार कोठे करावी?
* शेतकऱ्याने नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत पूर्वसूचना द्यावी.
* मोबाईलमधील मोबाईलमधील Crop Insurance App (क्रॉप इन्शुरन्स) ॲपद्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकाद्वारे ही पूर्वसूचना देता येईल.
* इंटरनेटमुळे अॅप सुरू होत नसेल किंवा टोल फ्री नंबर सतत एंगेज येत असल्यास तातडीने आपल्या बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा महसूल विभागाच्या कार्यालयात स्वतः जाऊन पूर्वसूचना द्यावी.
* तुमची तक्रार नोंदवून घेतली नसेल तर तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावे. अध्यक्ष असलेले तहसीलदार किंवा सदस्य सचिवपदावर असलेले तालुका कृषी अधिकारी तुमच्या तक्रारीची दखल घेतात. मात्र, याठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे तक्रारीची पोच घेणे गरजेचे आहे. पोच अर्जावरचा सही, शिक्का हा तुमच्या तक्रारीचा अधिकृत पुरावा असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to do complaint about crop insurance in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x