22 November 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

घरबसल्या ऑनलाईन जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं? | अगदी सोपं आहे - वाचा, शेअर करा

Caste certificate online apply in Marathi

मुंबई, ०७ जुलै | महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते.

जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) कुठे मिळते?
1. जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात
2. महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे:
ओळखीचा पुरावा (Identity Card): (यापैकी एक कागदपत्रं)
* पॅन कार्ड
* पासपोर्ट
* आधारकार्ड
* मतदान कार्ड
* रोजगार हमी योजना ओळखपत्र
* ड्रायव्हिंग लायसन्स
* फोटो
* सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र

पत्ता दर्शवणारा पुरावा (Address Proof): (यापैकी एक कागदपत्रं)
* पासपोर्ट
* आधारकार्ड
* मतदान कार्ड
* रेशन कार्ड
* पाणी बील
* ड्रायव्हिंग लायसन्स
* फोटो
* वीज बील
* घरफळा पावती
* सातबारा किंवा 8 अ उतारा

जातीचा पुरावा दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे:
* जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्याचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्याचे जात दर्शवणारे कागदपत्र आवश्यक असते. अर्जदार, त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा,
* अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो. हे उपलब्ध नसल्यास इतर कागदपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करावे लागते.
* वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
* वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
* सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र-अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
* ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
* जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
* सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे
* जात प्रमाणपत्र काढताना एखादे कागदपत्र नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार आणि शासनाच्या वेबसाईटवर मिळू शकते. किंवा नजीकच्या सेतू कार्यालयात संपर्क करा. आपले सरकार पोर्टलवर * * एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते.

आवश्यक कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा किंवा पुढील लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करून वाचा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/PDF-Caste-Certifcate-Online.pdf

लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे:
* वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र
* नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र जोडावे लागते.

स्वंयघोषणापत्र:
जात प्रमाणपत्र स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रं अपलोड केलेली असतील मंजूर होईल आणि तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?
* आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या.
* लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा.
* त्यातून पुढे महसूल सेवा निवडा.
* तिथून जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा.
* पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.
* तिथुन पुढील वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.
* 18 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर लाभार्थ्याची माहिती तिथे माहिती सादर करावी.
* अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.
* सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत.
* यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा.
* जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

21 दिवसांमध्ये प्रमाणपत्र:
आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांपर्यंत आपल्याला जात प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to get caste certificate from Aaple Sarkar Portal in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x