23 February 2025 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

उद्योग आधार नंबर कसा काढतात ? | ही आहे संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया

Register Udyog Aadhaar

मुंबई, 20 जून | जर तुम्ही उद्योजक असाल किंवा नवीन उद्योग सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. पण या आधी आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की उद्योग आधार कार्ड नेमकं आहे काय आणि ते का गरजेचं आहे. उद्योग आधार नंबर कसा प्राप्त कराल ? त्यासाठी कोणती कागदपत्रे आपल्याजवळ असणं गरजेच आहे आणि यासाठी किती खर्च येतो.

उद्योग आधार नंबर (UAN ) म्हणजे काय ?
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उद्योग आधार नंबर मिळवणे म्हणजे तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे. यापूर्वी व्यवसायाची नोंदणी करणे हि खूप जटील प्रक्रिया समजली जायची. MSME registation म्हणजेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची नोंदणी केल्यानंतरच केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेता येऊ शकत होता.

सूक्ष्म, लघु व मध्यम विकास अधिनियम २००६ नुसार जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आशाउद्योगाना स्वीकृतिपत्रदिले जात होते.
तथापि, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची नोंदणी सुलभ होण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम मंत्रालय, केंद्र शासन यांनी दि. १८.०९.२०१५ च्या अधिसूचने अन्वये एक पानी उद्योग आधार ज्ञापन पध्‍दती अंमलात आणली आहे. या नवीन पध्दतीनुसार, उद्योजक htpp://udyogaadhaar.gov.in या पोर्टलवर व्यवसायाचे Registration करुन आपला १२ अंकी Udyog Aadhaar Number मिळवु शकतात.

उद्योग आधार नंबर कसा प्राप्त कराल ?
मित्रहो , उद्योग आधार नंबर मिळवण्याच्या दोन पद्धती आहेत . एक तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरू शकता अथवा htpp://udyogaadhaar.gov.in या पोर्टलवर जाऊन आपल्या उद्योगाची नोंदणी विनाशुल्क करू शकता .

आवश्यक कागदपत्रे :
* उद्योग आधार सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे
* आधार कार्ड
* मोबाइलला नंबर (Registered with your Aadhaar Card )
* ई-मेल अकाउंट
या व्यतिरीक्त इतर इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही

उद्योग आधार नंबरसाठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल ?
१. सर्वात प्रथम उद्योग आधारच्या वेबसाईट वर जा उद्योग आधार Official Site – इथे क्लिक करा
२. पहिल्याच पृष्ठावर तुमच्यासमोर खालील प्रमाणे फॉर्म ओपन होईल. त्या रकान्यांमध्ये तुमचा आधारकार्ड नंबर आणि संपूर्ण नाव भरा.
३ . माहिती भरून झाल्यावर Validate & Generate OTP वर क्लिक करा. तुमचा जो मोबाइलक्रमांक तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे त्यावर एक OTP क्रमांक येईल
५. तो OTP क्रमांक खाली आलेल्या रकान्यामध्ये भरून व्हेरिफाय करा.
६. मोबाइलला नंबर व्हेरिफाय झाल्यानंतरत्याच्या खाली अजून काही फॉर्म ओपन होतील जिथे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती उदा- व्यवसायाचा पत्ता ,पॅन कार्ड, व्यसायाच स्वरूप इत्यादी, भरून सबमिट करावी लागेल.
७. अशा प्रकारे थोड्याच वेळात तुमच्या ई-मेल अकॉउंटवर उद्योग आधार सर्टिफिकेट रिसिव्ह होईल. त्यासोबत तुम्हला १२ अंकी UAN ही मिळेल.

महत्वाची सूचना: जर तुमचा मोबाइलला क्रमांक आधार कार्डशी लिंक नसेल तर एक पॉप-अप विंडो ओपन होईल त्याच्यावर ज्या सूचना येतील त्याच पालन करा आणि माहिती भरा. संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यावरतुमच्या E -mail अकाउंट वर तुमचा उद्योग आधार नंबर मिळेल .

आशा प्रकार अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या उद्योगाची नोंदणी करू शकता. उद्योग आधार संबधित कोणताही प्रश्न असेल तर खलील ईमेल अकाउंट वर संपर्क करा. [email protected]

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: How to Register for Udyog Aadhaar online news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x