13 January 2025 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा 30 जून 2022 पर्यंत घेता येणार लाभ | नोकरी गेल्यास सरकार भत्ता देणार

Atal Bima Dharak Yojana

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) ‘अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना’ 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, या योजनेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेता येणार होता. परंतु, या योजनेत वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कोरोना काळात या योजनेचा लाभ आणखी काही लोकांना घेता यावा यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे.

अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा 30 जून 2022 पर्यंत घेता येणार लाभ, नोकरी गेल्यास सरकार भत्ता देणार – How to take benefits of Atal Bima Dharak Yojana :

काय आहे योजना?
सरकार या योजनेंतर्गत नोकरी गेल्याला बेरोजगारांना भत्ता देणार आहे. 3 महिन्यापर्यंत बेरोजगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 3 महिन्यातील पगाराच्या सरासरी 50% दावा करता येऊ शकतो. विशेष म्हणजे 30 दिवसात या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना ESIC व्दारा कार्यान्वित आहे.

एकच वेळा घेता येणार लाभ:
अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेत एका लाभधारकला केवळ एकाच वेळेस लाभ घेता येणार आहे.परंतु, लाभ घेतेवेळी तो व्यक्ती मागील तीन महिन्यांपासून बेरोजगार असायला हवा. तरच त्याला सदरील योजनेचा लाभ घेता येईल.

कोणाला घेता येणार लाभ? जी व्यक्ती देशातील खाजगी क्षेत्रात नोकरी करत असेल आणि कंपनीकडून सदरील व्यक्तीचे पीएफ/ईएसआय कटत असेल त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु, वरील अट येते ही कायम करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार मागील 78 दिवसांपासून बेरोजगार असायला हवा.

या योजनेचा लाभ कसा मिळणार?
ईएसआयसीशी संबंधित कर्मचारी या विभागातील कुठल्याही शाखेत जाऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर केल्यानंतर आपल्या अर्जाची छाननी केली जाते. पात्र असलेल्या अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा केले जाते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to take benefits of Atal Bima Dharak Yojana.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x