पशुसंवर्धन योजना अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य उपक्रम | एक कॉल करा, घरपोच पशुवैद्यकीय सेवा
मुंबई, ०२ जुलै | पशु संवर्धन योजना संदर्भात जाणून घेवूयात. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरता पशु वैदकीय दवाखाना संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी पशु संवर्धन विभागाच्या विविध योजना सुरु असतात. त्या योजनांची आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात किंवा दुग्धव्यवसाय करतात त्यांना या योजनेचा खूप लाभ होऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी बांधवांकडे गाई, म्हशी आणि शेळ्या असतात त्याचप्रमाणे शेती कामासाठी गुरे देखील असतात. जनावरे आजारी पडली कि मग शेतकऱ्यांची खूप परवड होते त्यामुळे हा उपक्रम जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे.
पशुपालकांसाठी अत्यंत उपयोगी हि पशु संवर्धन योजना:
महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी भारत फायनान्स इंक्लूजन लिमिटेड या कंपनीचे कॉल सेंटर देखील सुरु करण्यात आलेले आहेत. तुमच्याकडे शेळ्या, मेंढ्या, दुधाळ जनावरे किंवा इतर जनावरे असतील आणि ते आजारी पडले तर अशा वेळी तुम्ही १९६२ फोन करताच कमीत कमी वेळात पशुपालकांस दर्जेदार पशुवैदकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शेळी पालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करत असाल तर या पशु संवर्धन योजनेचा लाभ घ्या:
बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक तरुण शेळीपालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय व शेतीपूरक व्यवसाय करतांना दिसत आहेत. शेळी पालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करत असतांना सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गुरांचे आजार होय. दुग्धव्यवसाय किंवा शेळी पालन व्यवसाय करत असताना आजारामुळे एखादे जनावर दगावले तर शेतकरी बांधवांना खूप मोठे नुकसान होते. जवळ पशुवैद्यकीय असेल तर उत्तम पण जर दवाखाना नसेल तर मात्र शेतकऱ्याची खूप कुचंबना होते. त्यामुळे पशु संवर्धन विभागाची हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे.
जनावरांच्या औषधोपचारासाठीचा अतिरिक्त खर्च वाचणार:
शेतकरी आपल्या जनावरांवर जीवापाड प्रेम करत असतो किंबहुना दावणीतील जनावरांना तो कुटुंबातील सदस्यच मानत असतो. जनावरे आजारी पडली कि शेतकऱ्यांची खूप परवड होते. उपचारासाठी जनावरांना गावापासून दूर असलेल्या पशुवैदकीय दवाखान्यात घेवून जावे लागते. कधी तर खाजगी डॉक्टरांना घरी बोलवावे लागते अशा वेळी घरापर्यंत पशुवैदकीय सुविधा दिल्यामुळे शेतकरी बांधवांना जास्त खर्च करावा लागतो. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेमुळे जनावरांवर होणारा अतिरिक्त खर्च वाचणार असून मोफत दारापर्यंत सुविधा मिळणार आहे.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना संदर्भातील अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबरवर फोन लावा:
अनेक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु झालेली आहे. पण कदाचित काही जिल्ह्यांच्या काही तालुक्यामध्ये अजून देखील हि योजना प्रभावीपणे सुरु झालेली नाही त्यामुळे तुम्ही ज्या तालुक्यातील असाल त्या तालुक्यामध्ये पशु संवर्धन विभागाची मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु झाली आहे का या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी १९६२ या टोल फ्री नंबरवर फोन लावून विचारून घ्या आणि पशु संवर्धन योजनेचा लाभ घ्या.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maharashtra Chief Minister Pashu Swastha Yojana call details news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today