22 November 2024 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना | कसं मिळवाल व्यावसायिक कर्ज ? - वाचा सविस्तर

Maharashtra state CMEGP scheme

मुंबई, २१ जून | राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात निरनिराळ्या क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारांनी CMEGP या योजनेची सुरवात गेली.

सद्यस्तिथीमध्ये देशामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजना मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. देशाची लोकसंख्या आणि सुशिक्षित रोजगारांची वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेऊन “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ” (Chief Minister Employment Generation Scheme) योजना 2019-20 या आर्थिक वर्षापासुन राज्यात कार्यान्वित करण्यात आली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची (CMEGP) कार्यवाही आणि उद्दिष्टे:
PMEGP योजना ही राज्यस्तरीय योजना असून याची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या उद्योग संचालनालय मुंबई या संस्थेकडून या योजनेची कार्यवाही केली जाते .

PMEGP चे उद्दिष्ट काय आहे:
राज्यातील युवक युवतींना आर्थिक आत्मनिर्भर बनवण्यसाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्याशासनाच्या आर्थिक सहाय्यतेने सक्षम करणे तसेच पुढील ५ वर्षांमध्ये १ लाख सूक्ष्म आणि लघु उद्योग स्थापित करून त्यामधून १० लाख लोकांसाठी रोजगार निर्माण करणे हे राज्य सरकारच्या PMEGP योजनेचे उद्दिष्ट आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा (PMEGP )लाभ कोण घेऊ शकत ?
लाभार्थी पात्रता – PMEGP योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे.

१. वयोमर्यादा:
१८ ते ४५ वर्षे वयोगटाच्या महाराष्ट्र राज्याचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. अनुसूचित जाती /जमाती /महिला /अपंग /माझी सैनिक यांच्यासाठी ५ वर्षे वयोमर्यादा शिथिल राहतील.

२. पात्र मालकी घटक:
उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी ,भागीदारी ,वित्तीय संस्थानी मान्यता दिलेली बचत गट.

३. शैक्षणिक पात्रता:
अ ) १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी ७वी पास मर्यादा
ब) २५ लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी १०वी पास मर्यादा

४. एकाच कुटुंबातील एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते (कुटुंब म्हणजे पती आणि पत्नी )

५. अर्जदार व्यक्तीने याआधी प्रधानमंत्री योजगार निर्मिती कार्यक्रमाचा (PMEGP ) अथवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण कसे आहे ?
१. बँक कर्ज – ६० ते ७५ %
२. अर्जदाराचे स्वभांडवल – ५ ते १० %
२. शासकीय अनुदान – १५ ते ३५ %

अ ) अनुसुची जाती/ अपंग / महिला / माझी सैनिक:
स्वगुंतवणूक – ५ %(एकूण प्रकल्पाचे भांडवल)
अनुदान – ग्रामीण भाग – ३५ % , शहरी भाग -२५ %
बँक लोन – ग्रामीण भाग – ६० % , शहरी भाग -७० %

ब ) ओपन प्रवर्ग:
स्वगुंतवणूक – १०%(एकूण प्रकल्पाचे भांडवल)
अनुदान – ग्रामीण भाग – २५% , शहरी भाग -१५%
बँक लोन – ग्रामीण भाग – ६५ % , शहरी भाग -७५ %

CMEGP अंतर्गत कोणते उद्योग पात्र ठरतात:
कायदेशीररित्या मान्यताप्राप्त उत्पादन, सेवा उद्योग , कृषी पूरक उद्योग ,कृषीवर आधारित उद्योग , ई -वाहतूक सेवा तसेच या संदर्भातील उद्योग cmegp योजने अंतर्गत पात्र ठरतात.

लघु उद्योगांची लिस्ट (List of Small scale Industries)
* साबण, तेल इत्यादी म्हणून हर्बल वस्तू बनविणे.
* हाताने बनविलेले चॉकलेट
* कुकीज आणि बिस्किटे बनविणे (पार्ले कंपनीनेही या मार्गाने सुरू केली)
* कॅन केलेला लोणी, तूप आणि चीज बनविणे आणि शिजविणे
* मेणबत्त्या आणि धूप काठी बनविणे
* टॉफी आणि साखर मिठाई बनवित आहे
* सोडा आणि विविध स्वादयुक्त पेय तयार करणे
* फळांचा लगदा काढून विक्री करा (फळांचा लगदा काढणे व विक्री करणे)
* क्लाऊड किचन – स्विगी / झोमाटो येथे अन्न विक्री
* घराचा वापर कूलर बनवा

CMEGP योजनेसाठी Apply करण्याकरिता कोणत्या कागदपात्रांची आवश्यकता आहे:
* पासपोर्ट साइज फोटो
* आधार कार्ड
* पॅन कार्ड
* जातीचा दाखला
* शैक्षणिक गुणपत्र
* जन्म दाखला /रहिवाशी दाखला
* स्पेसिअल कॅटेगरी सर्टिफिकेट
* अंडर टेकिंग फॉर्म
* प्रोजेक्ट रिपोर्ट
* इतर डॉक्युमेंट्स

CMEGP योजनेसाठी कसे Apply करतात / How to apply for CMEGP ?

१ प्रथम तुम्ही खालील संकेतस्थळाला भेट द्या
CMEGP वर जाण्यासाठी इथे क्लिक करा

२. होमपेज वरील डॅशबोर्ड वर Online application form for individual किंवा Online application form for non-individual या विकल्पांवर क्लिक करा.

३. या नंतर तुमच्या समोर CMEGP Application फॉर्म ओपन होईल यामध्ये वरील दिलेल्या डॉक्युमेंट्सच्या मदतीने फॉर्म भरून सबमिट करा.

अशा पद्धतीने आपण आपल्या उद्योगासाठी CMEGP च्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून घेऊ शकतो .

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Maharashtra state CMEGP scheme for business load news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x