22 February 2025 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

Old Ferfar and Satbara Utara | कौटुंबिक जमिनीचे 1880 सालापासूनचे जुने फेरफार नोंदवही, जुना ७/१२ उतारा ऑनलाईन कसे पाहायचे?

Old Sat Bara Utara online

Old Ferfar and Satbara Utara | जमिनीशी संबंधित कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतं.

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भूमिअभिलेख कार्यालयत सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते. आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन देण्याचे सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची माहिती आपण आता घेणार आहोत.

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:
* खालील वेबसाईट लिंक ओपन करा.
* https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in
* ई रेकॉर्ड वर क्लिक करा.
* e-Records (Archived Documents)
* या वेबसाईट वर पहिल्यांदा नवीन वापरकर्ता नोंदणी करा. (New User Registration)

एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे.

1. तुमचे नाव, मधले नाव, आडनाव, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्मतारीख इत्यादी गोष्टी ची नोंद करायचे आहे. एकदा काय वैयक्तिक माहिती भरून झाली की तुम्हाला तुमच्या पत्त्या विषयीची माहिती द्यायची आहे. यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक, इमारतीचे नाव पिनकोड, स्थान, शहर, जिल्हा, राज्य इत्यादींची माहिती द्यायची असते.

2. हे भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी क्रीएट करायचा आहे. यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल.

3. त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे . आता आपण जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते पाहू.

4. जुना फेरफार उतारा पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव निवदायचे आहे, पण इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची सध्या महाराष्ट्र सरकारने ही सुविधा फक्त सात जिल्ह्यासाठीच उपलब्ध करून दिली आहे. पण लवकरच ही सुविधा राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहेत.

5. पुढे तालुका, गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता अभिलेख उतारा हवा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आता मी फेरफार उतारा निवडलेला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा आठ अ उतारा हवा असेल तर 8 अ हा पर्याय निवडायचा. असे एकूण 58 अभिलेखांचे प्रकार येथे उपलब्ध आहेत.

6. त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध करायचा आहे त्यानंतर शोध निकाल या पेज वरती टाकलेल्या गट क्रमांकाच्या संबंधित फेरफाराची माहिती पाहू शकता. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की तिस-या गट क्रमांकाच्या संबंधित जमिनीच्या आधिकार अभिलेखात 1982 , 1984, 1994 बदल झालेले आहेत आणि त्यांचा फेरफार क्रमांक अनुक्रमे 39, 120 आणि 547 हा आहे. जर मला 1982 सालचा फेरफार पाहायचा असेल.

7. तर त्या समोरील कार्ड मध्ये ठेवा हा पर्याय यावर क्लिक केला आहे. आता समजा आपण पेज क्रमांक एक वरील माहिती पाहत आहोत त्याच्या समोरील वर्षांचे फेरफार उतारे तुम्हाला पाहायचे असल्यास तर तुम्ही पेज 2 , तीन वर क्लिक करुन ही माहिती पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ड या वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.

8. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सध्याची फाईल अशी ओपन होईल आणि सद्यस्थिती उपलब्ध आहे. त्या समोरील फाईल पहा. यावर क्लिक केलं की, तुमच्या समोर येतं 1982 फेरफार पत्र ओपन होईल. या पत्रकारावरील खाली बान असलेल्या चिन्हावर जर तुम्ही क्लिक केलं तर ते डाऊनलोड होईल आता तुम्ही स्क्रीन वर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Old SatBara Utara online from Bhulekha website check details on 01 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x