5 November 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

शेतकरी अन ग्रामीण बेरोजगारांसाठी | शेळी पालन शासकीय कर्ज योजना २०२१ - वाचा आणि लाभ घ्या

Sheli Palan Shasakiya Yojana 2021

मुंबई, १४ जून | मित्रांनो शेळी पालन कर्ज योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. शासनाच्या वतीने शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. तुम्ही जर शेळीपालन व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला शेळी पालन कर्ज योजना साठी अनुदान मिळणार आहे.

नाविन्यपूर्ण योजना किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ यांचेकडून देखील हि योजना राबविली जाते. नाविन्य पूर्ण योजनेसाठी लागणारा अर्ज pdf अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि अधिकची माहिती जाणून घ्या.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा:

शेळी पालन कर्ज:
शेळ्या व मेंढ्याचे सध्याचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेवून पूर्वीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील जी.आर. म्हणजेच शासन निर्णय दिनांक २५ मे २०२१ रोजी महाराष्ट्र शासनच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही शेळी पालन कर्ज योजनेचा जी.आर. म्हणजेच शासन निर्णय बघू शकता.

शेळी व मेढी खरेदी दरवाढ संदर्भातील जी.आर. उपलब्ध:
मित्रांनो शेळी मेंढीच्या वाढविलेल्या किमतीबाबतचा जी. आर. म्हणजेच शासन निर्णय आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचप्रमाणे शेळी मेंढी गटवाटपाच्या योजनेचे स्वरूप कसे असेल त्याचा अटी व शर्थी काय असतील, योजनेच्या अंमलबजावनीची कार्यपद्धती कशी असेल, जातीनिहाय कोणत्या समाजासाठी किती रक्कम भरावी लागेल, या संदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. शेळी पालन कर्ज किंवा अनुदान संदर्भातील महाराष्ट्र शासन निर्णय देखील झाला आहे.

शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागात लोकप्रिय:
मित्रांनो, नोकरी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. त्यामुळे अनेक तरुण उद्योग शेळी पालन व्यवसायाकडे वळतांना दिसत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील तरुण खासकरून शेळी पालन व्यवसायाकडे वळतांना दिसत आहे याचे कारण असे आहे कि शेळी पालन व्यवसाय करण्यास गाई व म्हशी खरेदी करून दुग्धव्यवसाय करण्यापेक्षा अधिक सोपा वाटतो. शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासठी शासकीय शेळीपालन प्रशिक्षण देखील मिळते.

शेळीपालन व्यवसाय ग्रामीण भागामध्ये यशस्वी होऊ शकतो:
शेळीचे दुध आरोग्यवर्धक असून शेळीच्या मासास मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे हा शेळी पालन व्यवसाय ग्रामीण भागात लोकप्रिय आहे आणि यासाठी आता अधिकचे शेळी पालन कर्ज मिळणार असल्यामुळे हा व्यवसाय करण्यास करण्यास आणखीनच मदत मिळणार आहे. शासनाच्या वतीने शेळी पालन व मेंढी पालन योजनेसाठी किती कर्ज मिळणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती घेवूयात.

शेळी पालन कर्ज योजना किंवा शेळी/मेंढी गटवाटपाच्या योजनेचे स्वरूप.
शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक भागात तग धरतील अशा १० शेळ्या व एक बोकड किंवा १० मेंढ्या एक १ नर मेंढा वाटप करण्यात येईल. १० शेळ्या अधिक एक बोकड व १० मेंढ्या अधिक १ नर मेंढा यांच्या किमतीचा चार्ट जी.आर.मध्ये म्हणजेच शासन निर्णयामध्ये दिलेला आहे. हा जी. आर. म्हणजेच शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.

शेळी/मेंढी गटवाटप योजनेसाठी किती अनुदान मिळेल:
मित्रांनो आता या योजनेसाठी कोणत्या समाजासाठी किती अनुदान मिळेल ते या ठिकाणी जाणून घेवूयात. या योजनेसाठी खुल्या व इ.मा.व. प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने ५० टक्के अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान या योजनेसाठी मिळणार आहे.

शेळी पालन कर्ज लाभार्थी निवडीचे प्राधान्यक्रम:
या योजनेसाठी खालील प्रमाणे लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम राबविण्यात येणार आहे.

* दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
* १ हेक्टर जमीन असलेले अत्यल्प भूधारक शेतकरी.
* रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण

योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड झाल्यास खालील प्रमाणे कागदपत्रे तयार करावीत:

* राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडणे:
* आधार क्रमांक व पॅन कार्ड बचत खात्याशी लिंक करणे आवश्यक
* अशा प्रकारे कागदपत्रे लाभार्थ्याला तयार करावे लागणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Sheli Palan Shasakiya Yojana 2021 Rural Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x