22 November 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शेतकऱ्यांसाठी खुशखबर | केंद्र सरकार बँक खात्यातर 4000 रुपये ट्रान्सफर करणार - करा ऑनलाईन नोंदणी

PM Kisan Scheme

नवी दिल्ली, २२ जून | केंद्र सरकार जून महिन्यात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये पाठवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत 9 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदवले आहे.

पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल. नाव नोंदवल्यानंतर केंद्र सरकार थेट तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करेल.

4000 रुपये मिळवण्यासाठी काय कराल?
गेल्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे त्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नव्हता. त्यामुळे आत शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत नाव नोंदवण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत आहे. तुमचे नाव नोंदवले गेल्यानंतर एप्रिल-जूनचा हप्ता जुलै महिन्यात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात नवा हप्ता जमा केला जाईल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

रजिस्ट्रेशन कशाप्रकारे कराल?
1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा.
2. Farmers Corner या ऑप्शनवर क्लिक करा.
3. आता तुम्हाला New Farmer Registration हा पर्याय निवडावा लागेल.
4. नवा टॅब ओपन झाल्यावर त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा.
5. त्यानंतर आपली माहिती आणि जमिनीचा तपशील नमूद करावा.
6. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा.

एखाद्या शेतकऱ्याने जून महिन्यात नोंदणी केली तर त्याला योजनेचा आठवा हप्ता जुलै महिन्यात मिळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुढचा हप्ता मिळेल. याचा अर्थ आता नाव नोंदवल्यास शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचे दोन्ही हप्ते लागोपाठ मिळतील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.

News Title : Union govt may transfer 4000 rupees in farmers account under PM Kisan Scheme news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x