5 February 2025 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL
x

#MeToo: स्त्रिया अत्याचार होतो तेव्हाच आवाज का उठवत नाहीत? सिंधुताईंचा रोखठोक सवाल

अहमदनगर : ‘मी-टू’ मोहिमेंतर्गत मागील काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यात अनेक कलाकार, राजकारणी आणि पत्रकारांची सुद्धा नाव पुढे आल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान १०-१५ वर्षांनी बाहेर येणारी ही प्रकरणं बघून अनेकांनी संशय सुद्धा व्यक्त केला होता. परंतु काही दिवसामध्ये या मोहिमेचा अतिरेक होत आहे असे वाटू लागल्याने ही मोहीम जास्त दिवस टिकणार असे एकूणच वातावरण झाले आहे. आता सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे सिंधुताईंनी सुद्धा या विषयावर मत व्यक्त केलं आहे.

सिंधुताईं या विषयावर बोलताना म्हणाल्या की, पण १०-१० वर्षांनी आरोप करणं हे चुकीचं आहे, शिवाय अत्याचार होतो तेव्हाच त्यावर बोलायला हवं असं त्या स्पष्ट म्हणाल्या. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथे उत्कर्ष या मल्टीस्टेट पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिम्मित सिंधुताई आल्या असता त्यांनी या विषयावर भाष्य केलं.

१०-१५ वर्षांनी आरोप केल्यामुळे जे दोषी नाहीत त्यांना सुद्धा नाहक शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला कुणाचीतरी पत्नी, बहीण किंवा आई आहे. तसेच पुरुष सुद्धा कुणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहे, याच भान ठेवावं असं ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई म्हणाल्या.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x