16 April 2025 5:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

Special Recipe | चटपटीत असा चीज कॉर्न समोसा नाश्त्याला नक्की बनवा - खास रेसिपी

Cheese corn samosa recipe

मुंबई १२ ऑगस्ट : घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ चीज कॉर्न समोसा बनवण्यासाठी खास रेसिपी…

साहित्य:
* दीड कप उकडलेले काॅर्न
* आवडीनुसार हिरवी मिरची
* 1 टिस्पून चिली फ्लेक्स
* मीठ चवीनुसार
* 1/2 टिस्पून काळिमिरी पूड
* 1/2 कप किसलेले प्रोसेस्ड चीज
* 2 ते ३ चीज स्लाइस कट केलेले
* 2 कप मैदा
* 2 टेबलस्पून गरम तेलाचे मोहन
* चिमूटभर ओवा
* बारीक चिरलेली कोथिंबीर
* तेल तळण्यासाठी

कृती:
१. बाऊलमधे काॅर्न (छान कोरडे करून घ्या.),चिली फ्लेक्स, मीठ, काळिमिरीपूड, कोथिंबीर, किसलेले चीज घालून फिलिंग तयार करा.

२. बाऊलमधे मैदा, मीठ, मोहन, ओवा घालून घट्टसर पीठ मळून घ्या (मोहन पिठाला छान चोळून घ्या)

३. तयार पीठाची पोळी लाटून मधून दोन भाग कट करून घ्या. व त्याला त्रिकोणी आकार देऊन पाण्याने साईड्स सील करा‌. व तयार मिश्रण भरून घ्या. फिलिंग भरताना चीज स्लाइसचे तुकडे टाकून घ्या.

४. अशाच प्रकारे सर्व समोसे तयार करा.

५. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर समोसे तळून घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Cheese corn samosa recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या