26 December 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
x

Special Recipe | उरलेल्या भाताची भजी आहे चटपटीत आणि खमंग बघा बनवून !

Yummy rice bhaji

मुंबई ५ मे : उरलेल्या भाताचं करायचं काय असा नेहमी प्रश्न पडतो. बऱ्याचदा केवळ फोडणीचा भात केला जातो अथवा थालिपीठ लावलं जातं. यापलीकडे जाऊन उरलेल्या भाताचं नक्की काय करता येणार? तर उरलेल्या भाताची चविष्ट आणि कुरकुरीत भजीही बनवता येतील. उरला असेल भात तर आजच्या आज ही भजी करून बघा. त्यासाठी नक्की काय साहित्य लागणार आहे आणि काय आहे कृती ते खालीलप्रमाणे आहे.

साहित्य :
साधारण एक वाटी उरलेला शिळा भात
1 चमचा आलं – लसूण – हिरव्या मिरचीची पेस्ट
अर्धा कप बेसन
2 चमचे चिरलेली कोथिंबीर
2 चमचे लिंबाचा रस
2 शिजलेले बटाटे (मॅश करून)
चवीनुसार मीठ
पाव चमचा हळद पावडर
1 चमचा लाल मिरची पावडर
1 चमचा धने जिरे पावडर
पाणी आवश्यकतेनुसार
तळण्यासाठी तेल

कृती:-
वर दिलेले सर्व साहित्य, केवळ तळण्यासाठीचे तेल सोडून सगळे एकत्र करून मळून घ्या. बटाटे नीट मॅश करा. त्यात फोड राहू देऊ नका नाहीतर त्याचा स्वाद वेगळा लागतो. हे सर्व एकत्र करून नीट मळून घ्या. तुम्हाला गरज असेल तितकंच पाणी यामध्ये घाला. ही पेस्ट जास्त पातळ अथवा जास्त जाड करू नका. जसे कांदा अथवा कोबीच्या भजीसाठी आपण पिठ भिजवतो तितकेच याचे प्रमाण आहे. त्याप्रमाणे भिजवा आणि त्यानंतर तेल तापायला ठेवा. व्यवस्थित तेल तापल्यानंतर हे पीठ सोडून भजीच्या आकारात तळा. तुमची चविष्ट आणि कुरकुरीत भजी तयार आहेत. हिरवी चटणी अथवा टॉमेटो सॉसबरोबर ही भजी सर्व्ह करा.

News English Summary: There is always the question of what to do with the rest of the rice. Often only fodani rice is served or thalipith is planted. What exactly can be done with the rest of the rice? The rest of the rice can also be made into tasty and crunchy bhaji. If there is any rice left, try this bhaji today. Exactly what materials are required for this and what is the action is as follows.

News English Title: Crunchy and crispy rice bhaji news update article

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x