24 February 2025 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Amount | पगारदारांच्या बँक अकाउंटमध्ये ग्रॅच्युइटीचे 2,88,461 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी नोकरदारांना महिना रु.9642 EPF पेन्शन मिळणार, रु.15000 सॅलरी असणाऱ्यांना ही फायदा NTPC Share Price | या PSU शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रोज घसरतोय, पुढे अजून किती घसरणार स्टॉक? - NSE: IRB Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Horoscope Today | मंगळवार 25 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर 2.42 टक्क्यांनी घसरला, स्टॉक प्राईस 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ - NSE: GTLINFRA
x

Special Recipe | संध्याकाळी खाण्यासाठी चटपटीत चाट कोन तयार आहेत

Delicious and chatpata chaat cone

मुंबई ५ मे : संध्याकाळी खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असत. पण हलकं फुलकं पाहिजे . म्हणून चपात्या उरल्या असतील तर आपण घरच्या घरी चाट करू शकतो . म्हणून चपातीपासून तयार केलेल्या चाटची कृती पहा. तुम्हाला नक्की आवडेल.

साहित्य :
१ टेबलस्पून बटर
४-५ लसणाच्या पाकळया बारीक चिरून
१ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
१ टेबलस्पून चिली सॉस
१ टेबलस्पून पाव भाजी मसाला
१ टेबलस्पून चिंचेची चटणी
चवीपुरता मीठ
२ टी स्पून लाल तिखट
२ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे
३ उकडलेले बटाटे
१ टेबलस्पून मैदा आणि पाणी पेस्ट
३-४ उरलेल्या चपात्या
सजावटीसाठी शेव,कोथिंबीर आणि गोड दही

कृती :
१. प्रथम पॅन मध्ये बटर गरम करावे. त्यांत चिरलेला लसूण, आलं लसणाची पेस्ट घालून परतवणे .
२. मिश्रण परतल्यावर त्यात पाव भाजी मसाला घालून थोडा वेळ परतून घ्यावे आणि बेताचे पाणी घालावे
३. नंतर त्यात लाल तिखट ,मीठ ,चिली सॉस आणि चिंचेची चटणी घालावी. उकळी आली की त्यात भाजलेल्या शेंगदाण्याची भरड,आणि उकडलेले बटाटे घालून मिश्रण एकजीव करून थंड होण्यास ठेवावे.
४. एका बाऊल मध्ये मैदा आणि पाण्याची पेस्ट बनवावी. उरलेल्या चपात्या अर्ध्या कापाव्या. चपातीच्या कडेला मैद्याची पेस्ट लावून त्याचे कोन बनवावे.
५. बनवलेल्या कोनांमध्ये वरील बटाट्याचे मिश्रण भरावे. कोनाची वरची बाजू मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून घयावे
६. मग ते कोन खरपूस गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
७. तळलेले कोन शेवेत डीप करावे
८. डिश मध्ये शेवेत डीप केलेले कोन ठेवून वरून कोथिंबीर आणि दही घालून सर्व्ह करावे.

News English Summary: I wanted something spicy to eat in the evening. But light food are needed. So if there are chapatis left, we can lick them at home. So watch the chaat recipe made from chapati. You will definitely like it.

News English Title: Delicious and chatpata chaat cone news update article.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x