31 January 2025 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

Special Recipe | घरच्याघरी बनवा झणझणीत एग्ग रोस्ट - पहा रेसिपी

Egg Roast Recipe in Marathi

मुंबई, ३१ जुलै | घरात वरचेवर तसे आपण अनेक रेसिपि बनवत असतो. मात्र, त्यात सर्वाधिक प्रमाण हे रोज रोज त्याच रेसीपीचे असते. अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या अंड्यासंबंधित देखील तोच प्रकार पाहायला मिळतो. तर चला आज आपण घरच्याघरी बनवणार आहोत एग म्हणजे अंडा रोस्ट;

संपूर्ण साहित्य:
* 1 चमचा तेल
* अर्धा चमचा जिरं
* 1 कांदा बारीक चिरून
* 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
* 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून
* 2 वाफवलेली अंडी
* 4 कढीपत्ता पाने
* अर्धा चमचा गरम मसाला पावडर
* पाव चमचा लाल तिखट पावडर
* पाव चमचा हळद पावडर
* चवीपुरते मीठ

संपूर्ण कृती:
१. प्रथम वाफवलेल्या अंड्याचे कवच काढून त्याचे सुरीच्या सहाय्याने मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
२. पॅनमध्येतेल गरम करून त्यात जिरं टाकून परतवावे.
३. नंतर त्यात कांदा आणि थोडेसे मीठ टाकून कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यावा.
४. आता त्यात आलं-लसूण पेस्ट व कढीपत्ता टाकून मिश्रण परतवावे.
५. नंतर टोमॅटो टाकून मऊसर शिजवून घ्यावा.
६. नंतर त्यात अंडय़ाचे तुकडे, लाल तिखट पावडर, गरम मसाला पावडर, हळद पावडर आणि वाटल्यास मीठ टाकून मिश्रण तीन ते चार मिनिटे परतवून घ्यावे.
७. मिश्रण छान एकजीव झाले की आच बंद करावी.
८. आता तयार एग्ग रोस्ट तयार भातासोबत अथवा बेड अथवा चपातीसोबत कोथिंबीरीने सजवून खाण्यास द्यावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Egg Roast Recipe in Marathi News updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x